Home /News /sport /

IPL 2020 : आयपीएलवर पुन्हा फिक्सिंगचं सावट, ऑफर मिळाल्याची खेळाडूची माहिती

IPL 2020 : आयपीएलवर पुन्हा फिक्सिंगचं सावट, ऑफर मिळाल्याची खेळाडूची माहिती

आयपीएल (IPL 2020) वर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंग (match fixing) साठी प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    दुबई, 3 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) वर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंग (match fixing) साठी प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणाऱ्या एका खेळाडूने एका बाहेरच्या व्यक्तीने आपल्याशी संपर्क केला आहे आणि हे फिक्सिंगशी संबंधित आहे, असं सांगितल्याचं वृत्त आहे. या खेळाडूने बीसीसीआयच्या ऍण्टी करप्शन युनिट (एसीयू)ला ही माहिती दिली आहे. पण या खेळाडूचं नाव अजून समोर आलेलं नाही. कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल स्पर्धा बायो सिक्युर बबलमध्ये खेळवली जात आहे. त्यामुळे कोणतीही बाहेरची व्यक्ती खेळाडूशी थेट संपर्क करु शकत नाही, तरीही खेळाडूशी संपर्क झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बीसीसीआयचे एसीयू प्रमुख अजित सिंह पीटीआयशी बोलताना म्हणाले, 'आयपीएलच्या खेळाडूला एका अनोळखी व्यक्तीने संपर्क केला आहे. या व्यक्तीची माहिती आम्ही घेत आहोत. यासाठी थोडा वेळ लागेल. ऍण्टी करप्शन प्रोटोकॉलनुसार या खेळाडूचं नाव जाहीर करता येत नाही.' खेळाडू बायो सिक्युर बबलमध्ये असल्यामुळे ऑनलाईन माध्यमातून त्यांना मॅच फिक्स करण्यासाठी ऑफर दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशाप्रकारे ऑफर आल्यानंतर खेळाडूने लगेचच एसीयूला याबाबत माहिती दिली. आयपीएल 2020 मध्ये ऍण्टी करप्शन यूनिट खेळाडूंसाठी ऑनलाईन काउन्सिलिंग सेशन घेत आहे. अंडर-19 टीममधून आयपीएल खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंनाही सगळे प्रोटोकॉल माहिती आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या ऍण्टी करप्शन युनिटला आपल्या तयारीवर पूर्ण विश्वास आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या