IPL 2020 : ...तर या 4 टीम पोहोचणार प्ले-ऑफमध्ये, जाणून घ्या गणित

IPL 2020 : ...तर या 4 टीम पोहोचणार प्ले-ऑफमध्ये, जाणून घ्या गणित

आयपीएल (IPL 2020) चा यंदाचा मोसम आता शेवटाकडे येऊन ठेपला आहे. तरी कोणतीही टीम अजून प्ले-ऑफ (Play Off) साठी क्वालिफाय झालेली नाही.

  • Share this:

दुबई, 28 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) चा यंदाचा मोसम आता शेवटाकडे येऊन ठेपला आहे. प्रत्येक टीमच्या आता 12 मॅच झाल्या असून मुंबई आणि बँगलोर यांनी 11 मॅच खेळल्या आहेत, पण या दोन्ही टीम आज एकमेकांविरुद्ध खेळणार असल्यामुळे त्यांच्यादेखील आजच 12 मॅच पूर्ण होतील. प्रत्येक टीमच्या या हंगामातल्या 12 मॅच झाल्या असल्या तरी कोणतीही टीम अजून प्ले-ऑफ (Play Off) साठी क्वालिफाय झालेली नाही. मुंबई, बँगलोर आणि दिल्ली यांच्या खात्यात सध्या 14 पॉईंट्स आहेत. तर पंजाब आणि कोलकाता 12 पॉईंट्सवर तसंच राजस्थान आणि हैदराबाद 10 पॉईंट्सवर आहेत.

दिल्लीच्या टीमने लागोपाठ 3 मॅच गमावल्यामुळे आणि पंजाबने लागोपाठ 5 मॅचमध्ये विजय मिळवल्यामुळे प्ले-ऑफची ही चुरस आणखी वाढली आहे. आयपीएलच्या आता उरलेल्या मॅचवर नजर टाकली तर प्ले-ऑफचं हे गणित आणखी चुरशीचं होऊ शकतं. त्यासाठी उरलेल्या मॅचचे निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत.

शक्यता पहिली

जर मुंबईने बँगलोरला हरवलं

कोलकाताने चेन्नईला हरवलं

पंजाबने राजस्थानला हरवलं

दिल्लीने मुंबईला हरवलं

हैदराबादने बँगलोरला हरवलं

पंजाबने चेन्नईला हरवलं

कोलकाताने राजस्थानला हरवलं

बँगलोरने दिल्लीला हरवलं

हैदराबादने मुंबईला हरवलं

तर मुंबई, कोलकाता, पंजाब आणि दिल्ली 16 पॉईंट्सवर प्ले-ऑफमध्ये पोहोचतील. अशा परिस्थितीमध्ये आजच्या सामन्यानंतरही कोणतीही टीम अधिकृतरित्या प्ले-ऑफला पोहोचणार नाही.

शक्यता दुसरी

बँगलोरने मुंबईला हरवलं

कोलकाताने चेन्नईला हरवलं

पंजाबने राजस्थानला हरवलं

मुंबईने दिल्लीला हरवलं

हैदराबादने बँगलोरला हरवलं

पंजाबने चेन्नईला हरवलं

कोलकाताने राजस्थानला हरवलं

दिल्लीने बँगलोरला हरवलं

हैदराबादने मुंबईला हरवलं

या परिस्थितीमध्येमध्ये मुंबई, बँगलोर, दिल्ली, पंजाब आणि कोलकाता 16 पॉईंट्सवर राहतील, त्यामुळे आयपीएलच्या 14 मॅच संपल्यानंतरही कोणतीच टीम थेट प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवणार नाही, त्यामुळे चांगला नेट रनरेट असलेल्या 4 टीम प्ले-ऑफला क्वालिफाय होतील.

तिसरी शक्यता

बँगलोरने मुंबईला हरवलं

कोलकात्याने चेन्नईला हरवलं

राजस्थानने पंजाबला हरवलं

मुंबईने दिल्लीला हरवलं

हैदराबादने बँगलोरला हरवलं

पंजाबने चेन्नईला हरवलं

राजस्थानने कोलकाताला हरवलं

बँगलोरने दिल्लीला हरवलं

हैदराबादने मुंबईला हरवलं

या परिस्थितीमध्ये बँगलोर आणि मुंबई या टॉप-2 मध्ये राहतील आणि कोलकाता, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि हैदराबाद 14 पॉईंट्सवर राहतील. त्यामुळे उरलेल्या 2 टीम नेट रनरेटवर प्ले-ऑफमध्ये पोहोचतील.

Published by: Shreyas
First published: October 28, 2020, 3:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या