IPL 2020 : अर्धी आयपीएल बाकी, पण या टीमसाठी प्ले-ऑफ गाठणं अवघड

IPL 2020 : अर्धी आयपीएल बाकी, पण या टीमसाठी प्ले-ऑफ गाठणं अवघड

आयपीएल (IPL 2020)चा यंदाचा मोसम अजून अर्धाही झालेला नाही, पण काही टीमसाठी प्ले ऑफ गाठणं आताच कठीण होऊन बसलं आहे.

  • Share this:

दुबई, 8 ऑक्टोबर  : आयपीएल (IPL 2020)चा यंदाचा मोसम अजून अर्धाही झालेला नाही. पण आतापर्यंतच्या स्पर्धेत नेहमीप्रमाणेच बहुतेक मॅच या रोमांचक झाल्या आहेत. यंदाच्या मोसमातल्या बहुतेक मॅच या शेवटच्या बॉलला संपल्या आहेत, तर काही मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्येही लागला आहे. यावर्षीच्या आयपीएलमधले अजून अर्धेही सामने झाले नसले, तरी काही टीमसाठी प्ले-ऑफला पोहोचणं आत्ताच कठीण झालं आहे.

पंजाबचा केवळ एकच विजय

यंदाच्या मोसमात कागदावर मजबूत वाटत असणाऱ्या पंजाब (Kings XI Punjab)ची कामगिरी खराब झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 5 मॅचपैकी 4 मॅचमध्ये पंजाबचा पराभव झाला आहे, तर फक्त एकच मॅच त्यांना जिंकता आली. आतापर्यंतच्या सगळ्या आयपीएलचं रेकॉर्ड बघितलं तर प्ले-ऑफ मध्ये अगदी सहज पोहोचण्यासाठी टीमला 16 पॉईंट्सची गरज पडते. पंजाबच्या हातात आता 9 मॅच आहेत. 16 पॉईंट्सवर पोहोचण्यासाठी पंजाबला या 9 मॅचपैकी 7 मॅच जिंकाव्या लागणार आहेत. पंजाबने या 9 पैकी 6 मॅच जिंकल्या तर ते 14 पॉईंट्सपर्यंत पोहोचतील. या परिस्थितीमध्ये त्यांना त्यांचा नेट रनरेट चांगला ठेवावा लागेल. म्हणजेच जिंकायच्या मॅच जास्त रनच्या फरकाने किंवा कमी ओव्हरमध्ये जिंकाव्या लागतील, तसंच पराभवही मोठ्या फरकाने होऊन चालणार नाही.

चेन्नईलाही धोका

चेन्नई (Chennai Super Kings) च्या टीमने आतापर्यंत त्यांनी खेळलेल्या प्रत्येक मोसमात प्ले-ऑफ गाठलं आहे. यंदा मात्र त्यांचा प्रवास खडतर सुरू आहे. चेन्नई (CSK) ने या मोसमात खेळलेल्या 6 पैकी 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, तर त्यांना 2 मॅचच जिंकता आल्या आहेत. 16 पॉईंट्स मिळवून प्ले-ऑफ गाठण्यासाठी चेन्नईला उरलेल्या 8 मॅचपैकी 6 मॅच जिंकाव्या लागतील. या 8 पैकी चेन्नईला 5 मॅचच जिंकता आल्या, तर त्यांचे 14 पॉईंट्स होतील. अशा परिस्थितीमध्ये त्यांनाही पंजाबप्रमाणेच मोठ्या फरकाने जिंकावं लागेल आणि पराभवाचा फरक कमी ठेवावा लागेल.

Published by: Shreyas
First published: October 8, 2020, 7:44 AM IST
Tags:

ताज्या बातम्या