IPL 2020 : डुप्लेसिसला पाणी आणताना बघणं वेदनादायी, सहकाऱ्याने बोलून दाखवलं दु:ख

IPL 2020 : डुप्लेसिसला पाणी आणताना बघणं वेदनादायी, सहकाऱ्याने बोलून दाखवलं दु:ख

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी निराशाजनक झाली आहे. खराब फॉर्ममधून जात असलेल्या चेन्नईने अजूनही इम्रान ताहिर (Imran Tahir)ला एकही संधी दिली नाही. बेंचवर बसून असलेल्या इम्रान ताहिर याने अश्विनसोबत युट्यूब चॅनलवर संवाद साधला. यावेळी बोलताना ताहिर म्हणाला, 2019 साली फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) ला पाणी आणताना बघणं वेदनादायक होतं.

  • Share this:

दुबई, 23 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK)ची कामगिरी निराशाजनक झाली आहे. खराब फॉर्ममधून जात असलेल्या चेन्नईने अजूनही इम्रान ताहिर (Imran Tahir)ला एकही संधी दिली नाही. बेंचवर बसून असलेल्या इम्रान ताहिर याने अश्विनसोबत युट्यूब चॅनलवर संवाद साधला. यावेळी बोलताना ताहिर म्हणाला, 2019 साली फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) ला पाणी आणताना बघणं वेदनादायक होतं.

अश्विनने इम्रान ताहिरला यंदाच्या मोसमात तू खेळणार का नाही? असं विचारलं. तेव्हा त्याला उत्तर देताना ताहिर म्हणाला, 'मला याबाबत काहीही कल्पना नाही. ह्या आधी 2019 मध्ये फाफ डू प्लेसीने मैदानात खेळाडूंना पाणी देण्याच काम केलं. ते पाहणं माझ्यासाठी खूप वेदनादायक होतं, कारण फाफ हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याची टी-20 सरासरी अगदीच उत्कृष्ट असून, त्याला पूर्ण सिझन टीम बाहेर राहावं लागलं होतं. ह्या वर्षी मी पाणी नेत असताना, कळलं की त्याला त्यावेळी कसं वाटलं असेल. मी त्याच्याशी या संबंधित चर्चा देखील करतो.'

'चेन्नईची टीम सर्वोत्कृष्ट आहे, त्यांच्याकडून आमच्या कुटुंबाचीही काळजी घेतली जात आहे. चाहत्यांनीही चेन्नई सुपर किंग्जवर खूप प्रेम केलं आहे आणि ते खेळाडूंचा आदर करतात. मला या टीमची संस्कृती आवडते. टीममधले सहकारी तुम्हाला नेहमीच चांगली साथ देतात. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी चांगली कामगिरी करता येत नाही,' अशी प्रतिक्रिया ताहिरने दिली.

ताहिरने आयपीएलच्या 2019 सालच्या मोसमात 17 मॅचमध्ये 26 विकेट घेतल्या. मागच्यावर्षी सर्वाधिक विकेट घेतल्याबद्दल पर्पल कॅप मिळवणऱ्या ताहिरला यंदा एकही संधी मिळालेली नाही. चेन्नईकडे सध्या रवींद्र जडेजा, पियुष चावला आणि कर्ण शर्मा हे तीन स्पिनर आहेत, पण आतापर्यंतच्या स्पर्धेतल्या 10 पैकी एका सामन्यातही त्यांना ताहिरला सामावून घेता आलेलं नाही. चेन्नईचा ऑलराऊंडर ड्वॅन ब्राव्हो दुखापतीमुळे उरलेली स्पर्धा खेळू शकणार नाही, त्यामुळे त्याच्याऐवजी आतातरी ताहिरला संधी मिळते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published by: Shreyas
First published: October 23, 2020, 3:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या