IPL 2020 : कोलकात्याचं जोरदार कमबॅक, दिल्लीला 195 रनचं आव्हान

IPL 2020 : कोलकात्याचं जोरदार कमबॅक, दिल्लीला 195 रनचं आव्हान

आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)ने सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर जोरदार कमबॅक केलं आहे. या मॅचमध्ये दिल्लीला विजयासाठी 195 रनचं आव्हान मिळालं आहे.

  • Share this:

अबु धाबी, 24 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)ने सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर जोरदार कमबॅक केलं आहे. या मॅचमध्ये दिल्लीला विजयासाठी 195 रनचं आव्हान मिळालं आहे. शुभमन गिल, राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिक यांच्या विकेट गमावल्यानंतर नितीश राणा आणि सुनिल नारायण यांनी दिल्ली (Delhi Capitals)च्या बॉलिंगवर आक्रमण केलं. नितीश राणाने 53 बॉलमध्ये 81 रन केले, तर सुनिल नारायण 32 बॉलमध्ये 64 रन करुन आऊट झाला. दिल्लीकडून रबाडा, नॉर्किया आणि स्टॉयनिसला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.

या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये दिल्लीने टीममध्ये दोन बदल केले आहेत. पृथ्वी शॉऐवजी अजिंक्य रहाणेला, तर डॅनियल सॅम्सऐवजी एनरिक नॉर्कियाचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दुसरीकडे कोलकात्यानेही त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले आहेत. टॉम बॅन्टन आणि कुलदीप यादव यांच्याजागी नागरकोटी आणि सुनिल नारायण यांचा टीममध्ये समावेश झाला आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम दुसऱ्या आणि कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीच्या टीमने आजची मॅच जिंकली तर ते पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर जातील, तर कोलकात्याला आजचा सामना जिंकता आला तर ते प्ले-ऑफच्या रेसमध्ये आणखी पुढे निघून जातील, पण दुसरीकडे आज जर कोलकात्याचा पराभव झाला, तर मात्र प्ले-ऑफची रेस आणखी रोमांचक होईल

दिल्लीची टीम

शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, शिमरन हेटमायर, अक्सर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, तुषार देशपांडे, एनरिक नोर्टजे

कोलकात्याची टीम

शुभमन गिल, सुनिल नारायण, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती

Published by: Shreyas
First published: October 24, 2020, 3:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या