Home /News /sport /

IPL 2020 : नितीश राणाचं शतक हुकलं, कोलकात्याचं चेन्नईला 173 रनचं आव्हान

IPL 2020 : नितीश राणाचं शतक हुकलं, कोलकात्याचं चेन्नईला 173 रनचं आव्हान

नितीश राणा (Nitish Rana) च्या अर्धशतकी खेळीमुळे कोलकाता (KKR)ने चेन्नई (CSK)ला विजयासाठी 173 रनचं आव्हान ठेवलं आहे.

    दुबई, 29 ऑक्टोबर : नितीश राणा (Nitish Rana) च्या अर्धशतकी खेळीमुळे कोलकाता (KKR)ने चेन्नई (CSK)ला विजयासाठी 173 रनचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, पण शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी कोलकात्याला चांगली सुरुवात करुन दिली. शुभमन गिल 26 रनवर आऊट झाला, तर नितीश राणाने 61 बॉलमध्ये 87 रन केले. दिनेश कार्तिकने 10 बॉलमध्ये नाबाद 21 रन करुन कोलकात्याला 170 रनच्या पुढे नेलं. चेन्नईकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर जडेजा, मिचेल सॅन्टनर आणि कर्ण शर्मा याला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आणखी सोपा करण्यासाठी कोलकात्याला हा सामना जिंकणं गरजेचं आहे, तर चेन्नई आधीच प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर झाली आहे, त्यामुळे फक्त सन्मानासाठी ते मैदानात उतरत आहेत. या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)ने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचसाठी चेन्नईने टीममध्ये तीन बदल केले आहेत. फाफ डुप्लेसिस, इम्रान ताहिर आणि मोनू कुमार यांना डच्चू देण्यात आला आहे, तर वॉटसन, लुंगी एनगिडी आणि कर्ण शर्मा यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दुसरीकडे कोलकात्याने प्रसिद्ध कृष्णाऐवजी रिंकू सिंगला संधी दिली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकात्याची टीम पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी 12 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नईने 12 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. कोलकात्याची टीम शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, इयन मॉर्गन, रिंकू सिंग, सुनिल नारायण, पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्ती चेन्नईची टीम ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, एमएस धोनी, एन जगदीशन, सॅम करन, रविंद्र जडेजा, मिचेल सॅन्टनर, कर्ण शर्मा, दीपक चहर, लुंगी एनगिडी
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या