IPL 2020 : वर्षाआधी आयसीसीने घातली होती बंदी, आता गाजवतोय आयपीएल

IPL 2020 : वर्षाआधी आयसीसीने घातली होती बंदी, आता गाजवतोय आयपीएल

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातली चुरस आणखी वाढली आहे. सुरुवातीला दुबळ्या वाटणाऱ्या पंजाब (KXIP)ने बँगलोर, मुंबई आणि दिल्लीचा पराभव करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

  • Share this:

दुबई, 21 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातली चुरस आणखी वाढली आहे. सुरुवातीला दुबळ्या वाटणाऱ्या पंजाब (KXIP)ने बँगलोर, मुंबई आणि दिल्लीचा पराभव करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. याचसोबत पंजाबने पॉईंट्स टेबलमध्येही मोठी उडी घेतली आहे. सातव्या क्रमांकावर असलेली पंजाबची टीम आता पाचव्या क्रमांकावर आली आहे. दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये निकोलस पूरन (Nicholas Pooran)ने जलद अर्धशतक करत पंजाबला जिंकवलं. या मोसमात पूरनने बॅटिंगबरोबरच त्याच्या शानदार फिल्डिंगनेही कमाल दाखवली आहे.

निकोलस पूरनने आतापर्यंत 10 मॅचमध्ये 183.22च्या सरासरीने 295 रन केले आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. पंजाबने या मोसमात 4 मॅच जिंकल्या आहेत, आणि या तिन्ही मॅचमध्ये पूरनने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पूरनसाठी हा आयपीएल मोसम चांगला जात असला, तरी मागच्या वर्षी बंदी असल्यामुळे तो आपल्याच टीमकडून खेळू शकला नव्हता.

पूरनवर 2019 साली 4 टी-20 मॅचसाठी बंदी घालण्यात आली होती. लखनऊमध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये त्याने बॉलशी छेडछाड केली होती, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. घडलेला प्रकार पूरनने स्वीकारला होता आणि चाहते, तसंच क्रिकेट बोर्डाचीही त्याने माफी मागितली. भविष्यात ही चूक परत करणार नाही, अशी ग्वाहीही त्याने दिली होती.

निकोलस पूरन कर रहे हैं आतिशी बल्लेबाजी Photo Credit: @lionsdenkxip/Twitter

2015 साली गंभीर अपघात

क्रिकेट कारकिर्द सुरू व्हायच्या आधीच पूरनला गंभीर दुखापत झाली होती. 2015 साली झालेल्या अपघातामुळे सहा महिने त्याला चालताही येत नव्हतं. त्यावेळी कायरन पोलार्डने पूरनला मदत केली. अपघात झाला तेव्हा पूरनचं वय 20 वर्षांचं होतं. पोलार्डच्या मदतीमुळेच तो टीममध्ये पुन्हा आला.

Published by: Shreyas
First published: October 21, 2020, 3:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या