Home /News /sport /

IPL 2020 : पूरन होता सगळ्यात मोठ्या विक्रमाजवळ, थोडक्यासाठी हुकला

IPL 2020 : पूरन होता सगळ्यात मोठ्या विक्रमाजवळ, थोडक्यासाठी हुकला

आयपीएल (IPL 2020) मध्ये गुरुवारी पंजाब (KXIP)ला आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागलं. पण पराभवानंतरही निकोलस पूरन (Nicholas Pooran)च्या बॅटिंगची चर्चा सुरू आहे.

    दुबई, 9 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये गुरुवारी पंजाब (KXIP)ला आणखी एका पराभवाला सामोरं जावं लागलं. हैदराबाद (SRH)ने पंजाबचा 69 रननी पराभव केला. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टोने पंजाबच्या बॉलिंगची धुलाई केली. वॉर्नरने 52 आणि बेयरस्टोने 97 रन बनवले. पण पराभवानंतरही निकोलस पूरन (Nicholas Pooran)च्या बॅटिंगची चर्चा सुरू आहे. पूरनच्या आतषबाजीमुळे थोडा वेळ हैदराबादच्या टीमलाही भीती वाटली होती. पूरन स्वत:च्या जीवावरच पंजाबला जिंकवतोय, असं वाटत होतं. फक्त 17 बॉलमध्येच त्याने अर्धशतक पूर्ण केलं. यंदाच्या मोसमातलं हे सगळ्यात जलद अर्धशतक होतं. आयपीएलमध्ये सगळ्यात जलद अर्धशतकाचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. राहुलने 2018 साली फक्त 14 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. या यादीत दुसरा क्रमांक युसुफ पठाण आणि सुनील नारायण यांचा आहे. या दोघांनी 15 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. याशिवाय 8 बॅट्समननी 17 बॉलमध्ये अर्धशतक केलं आहे. यात आता पूरनच्या नावाचाही समावेश झाला आहे. यंदाच्या मोसमात पूरन आधी संजू सॅमसनने चेन्नईविरुद्ध 19 बॉलमध्येच 50 रन केले होते. पाचव्या ओव्हरमध्ये बॅटिंग करायला आलेल्या पूरनने फोर मारून त्याचं खातं उघडलं. सहाव्या ओव्हरमध्ये त्याने नटराजनच्या बॉलिंगवर उत्तुंग सिक्स मारला, तर सातव्या ओव्हरमध्ये पूरनने लागोपाठ दोन बॉलला सिक्स लगावले. याच ओव्हरमध्ये केएल राहुल आऊट झाला, पण पूरनने आक्रमण सुरूच ठेवलं. नववी ओव्हर टाकायला आलेल्या अब्दुल समदला पूरनने 28 रन ठोकले. पूरनने समदच्या पहिल्या बॉलवर सिक्स, दुसऱ्या बॉलवर फोर मारली. यानंतर लागोपाठ 3 बॉलवर पूरनने सिक्स लगावल्या. 5 फोर आणि 7 सिक्स एका बाजूने पंजाबच्या विकेट पडत होत्या, तरी पूरन दुसरीकडून आक्रमक खेळत होता. 17 बॉलमध्ये अर्धशतक करणाऱ्या पूरनने फक्त 37 बॉलमध्ये 77 रन केले. या दरम्यान त्याने 5 फोर आणि 7 सिक्स लगावले. म्हणजेच पूरनने 62 रन बाऊंड्री मारून तर फक्त 15 रन धावून काढल्या. या मॅचमध्ये पंजाबचा पराभव झाला असला, तरी पूरनचा हा धमाका बराच काळ क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहिल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या