अबु धाबी, 6 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)मध्ये आज मुंबई (Mumbai Indians)चा सामना राजस्थान (Rajasthan Royals)सोबत होणार आहे. मुंबईची टीम ही सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. याआधीच्या दोन्ही मॅचमध्ये मुंबईने हैदराबाद (Sunrisers Hyderabad)आणि पंजाब (Kings XI Punjab)यांचा पराभव केला होता. तर दुसरीकडे राजस्थानने त्यांचे मागचे दोन्ही सामने गमावले आहेत. राजस्थानला कोलकात्याने 37 रननी आणि बैंगलोरने 8 विकेटने पराभूत केलं. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ही मॅच जिंकून पुन्हा पहिल्या क्रमांकावर जाण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.
या मॅचमध्ये मुंबईची टीम बदल करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, तर दुसरीकडे राजस्थान वेगळ्या खेळाडूंसह मैदानात उतरू शकते. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही याचे संकेत दिले होते. राजस्थानची मधली फळी संघर्ष करताना दिसत आहे. रियान पराग आणि रॉबिन उथप्पा खराब फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे यशस्वी जयस्वालला संधी मिळू शकते. जयस्वाल टीममध्ये आला तर स्मिथ मधल्या फळीत बॅटिंगला येईल, त्यामुळे टीमला मजबुती मिळेल.
बॉलिंगमध्येही बदल होणार?
राजस्थानच्या बॉलिंगनेही यंदाच्या मोसमात त्यांना दगा दिला आहे. जयदेव उनाडकटला 4 मॅचमध्ये फक्त 1 विकेट घेता आली आहे. त्यामुळे जोफ्रा आर्चर आणि टॉम कुरनवर दबाव वाढला आहे. त्यामुळे स्मिथ वरुण ऍरॉन किंवा कार्तिक त्यागीला संधी देऊ शकतो.
मुंबईची संभाव्य टीम
रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, राहुल चहर, जेम्स पॅटिनसन, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट
राजस्थानची संभाव्य टीम
जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, डेव्हिड मिलर, मनन व्होरा, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट/वरुण ऍरॉन/कार्तिक त्यागी
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.