Home /News /sport /

IPL 2020 : 'पुन्हा ती चूक करू नकोस', प्रशिक्षक जयवर्धनेनी दिली डिकॉकला समज

IPL 2020 : 'पुन्हा ती चूक करू नकोस', प्रशिक्षक जयवर्धनेनी दिली डिकॉकला समज

फोटो सौजन्य : मुंबई इंडियन्स (फेसबूक पेज)

फोटो सौजन्य : मुंबई इंडियन्स (फेसबूक पेज)

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शुक्रवारी कोलकाता (KKR)विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा 8 विकेटने दणदणीत विजय झाला. कोलकात्याने ठेवलेलं 149 रनचं आव्हान मुंबईने अगदी सहज पार केलं. या मॅचमध्ये क्विंटन डिकॉक (quinton de kock) ने चूक केली.

पुढे वाचा ...
    अबु धाबी, 17 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शुक्रवारी कोलकाता (KKR)विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा 8 विकेटने दणदणीत विजय झाला. कोलकात्याने ठेवलेलं 149 रनचं आव्हान मुंबईने अगदी सहज पार केलं. मुंबईचा ओपनर क्विंटन डिकॉक (quinton de kock) ने 44 बॉलमध्ये 78 रनची वादळी खेळी केली. सुरुवातीच्या काही मॅचमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या क्विंटन डिकॉकला मागच्या काही सामन्यांमध्ये पुन्हा सूर गवसला. कोलकाताविरुद्धच्या या मॅचमध्ये क्विंटन डिकॉकला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. पण या मॅचमध्ये त्याने मोठी चूक केली. या मॅचमध्ये क्विंटन डिकॉक त्याची मॅचसाठीची पँट घालण्याऐवजी सरावासाठीची पँट घालून मैदानात उतरला. मुंबई इंडियन्सने याबाबतचा खुलासा करणारा एक व्हिडिओ त्यांच्या फेसबूक पेजवर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुंबईचे प्रशिक्षक महेला जयवर्धने पुन्हा असं करू नकोस, कारण मार्केटिंगच्या माणसांना हे चालणार नाही, असं त्याला हसत हसत सांगताना दिसत आहेत. कालच्या मॅचमध्ये क्विंटन डिकॉकची पँट व्यतिरिक्त इतर सगळ्या गोष्टी मुंबईसाठी व्यवस्थित होत्या, असं महेला जयवर्धने या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. क्विंटन डिकॉक बॅटिंग करायला मैदानात आल्यानंतर आपण सरावासाठीची पँट घातली आहे, असं त्याच्या लक्षात आलं. हे पाहून मुंबईचा कर्णधार रोहित शर्मालाही हसू आवरलं नाही. क्विंटन डिकॉक या मोसमात मुंबईचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू आहे. 8 मॅचच्या 8 इनिंगमध्ये त्याने 38.42 ची सरासरी आणि 151.97 च्या सरासरीने 269 रन केले आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. क्विंटन डिकॉकने या मोसमात 11 सिक्स आणि 26 फोर मारले आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या