IPL 2020 : एक दिवस तीन सुपर ओव्हर, रोमांचक सामन्यात पंजाबचा मुंबईवर विजय

IPL 2020 : एक दिवस तीन सुपर ओव्हर, रोमांचक सामन्यात पंजाबचा मुंबईवर विजय

आयपीएल (IPL 2020) च्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी तीन सुपर ओव्हरचा रोमांच पाहायला मिळाला. मुंबई आणि पंजाब यांच्यामध्ये दोन सुपर ओव्हरचे सामने पाहायला मिळाले. पहिली सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा विजय झाला.

  • Share this:

दुबई, 18 ऑक्टोबर :  आयपीएल (IPL 2020) च्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी तीन सुपर ओव्हरचा रोमांच पाहायला मिळाला. मुंबई आणि पंजाब यांच्यामध्ये दोन सुपर ओव्हरचे सामने पाहायला मिळाले. पहिली सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा विजय झाला.

दुसरी सुपर ओव्हर

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने पोलार्ड आणि हार्दिक पांड्याला बॅटिंगला पाठवलं, तर पंजाबने क्रिस जॉर्डनला बॉलिंग दिली.  मुंबईने या 6 बॉलमध्ये 11 रन केले. शेवटच्या बॉलवर मयंक अग्रवालने जबरदस्त फिल्डिंग करत सिक्स वाचवली आणि मुंबईला फक्त 2 रनच मिळाल्या. या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने हार्दिक पांड्या आणि पोलार्ड ओपनिंगला आले. हार्दिक पांड्याची विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादव बॅटिंगला आला. पाचव्या बॉलवर अंपायरने पोलार्डला आऊट दिलं, पण त्याने डीआरएस घेतला आणि थर्ड अंपायरने पोलार्ड आऊट नसल्याचं सांगितलं. मुंबईने 12 रनचं आव्हान रोखण्यासाठी ट्रेन्ट बोल्टला बॉलिंग दिली, तर पंजाबकडून क्रिस गेल आणि मयंक अग्रवाल बॅटिंगला आले. बोल्टच्या पहिल्याच बॉलला गेलने सिक्स मारला, तर दुसऱ्या बॉलला गेलने एक रन काढली. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर मयंक अग्रवालने फोर मारून पंजाबला जिंकवलं,

पहिली सुपर ओव्हर

पंजाब आणि मुंबईच्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर पंजाबला 5 रनच करता आले, त्यामुळे मुंबईला विजयासाठी 6 रनचं आव्हान मिळालं. पंजाबने सुरुवातीला केएल राहुल आणि निकोलस पूरनला बॅटिंगला पाठवलं, पण निकोलस पूरन दुसऱ्याच बॉलला आऊट झाला, यानंतर दीपक हुडा बॅटिंगला आला, पण त्यालाही चमक दाखवता आली नाही. बुमराहच्या शेवटच्या बॉलवर केएल राहुल आऊट झाला. पंजाबने दिलेलं हे आव्हान मुंबईने  पार केलं. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक ओपनिंगला आले.

मुंबईने ठेवलेल्या 177 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 176 रनच करता आल्या. या लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या पंजाबची सुरुवात फार चांगली झाली नाही. ओपनर मयंक अग्रवाल 11 रन करून माघारी परतला. यानंतर केएल राहुलने पहिले क्रिस गेल आणि मग निकोलस पूरनबरोबर फटकेबाजी सुरूच ठेवली. राहुल 51 बॉलमध्ये 77 रन करून आऊट झाला, तर गेल आणि निकोलस पूरनने प्रत्येकी 24-24 रन केले.

पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 9 रनची गरज होती आणि मैदानात क्रिस जॉर्डन आणि दीपक हुडा होते. पण ट्रेन्ट बोल्टने फक्त 8 रन देऊन सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने 3 आणि राहुल चहरने 2 विकेट घेतल्या.

या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 176 रन केले. पोलार्ड आणि कुल्टर नाईल यांनी शेवटच्या काही ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला या धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं. पोलार्डने 12 बॉलमध्ये नाबाद 34 रन केले, तर कुल्टर नाईलही 12 बॉलमध्ये 24 रनवर नाबाद राहिला. मुंबईकडून क्विंटन डिकॉकने 43 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली. कृणाल पांड्यानेही 30 बॉलमध्ये 34 रन करून डिकॉकला चांगली साथ दिली. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंगला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर क्रिस जॉर्डन आणि रवी बिष्णोई यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

हैदराबाद आणि कोलकात्यामध्येही सुपर ओव्हर

याआधी दुपारी हैदराबाद आणि कोलकाता यांच्यातही सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. या सुपर ओव्हरमध्ये कोलकात्याने हैदराबादचा पराभव केला.

Published by: Shreyas
First published: October 19, 2020, 12:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading