IPL 2020 : यंदाच्या आयपीएलमधला भन्नाट कॅच, पाहा VIDEO

IPL 2020 : यंदाच्या आयपीएलमधला भन्नाट कॅच, पाहा VIDEO

IPL 2020 पंजाब (Kings XI Punjab) आणि मुंबई (Mumbai Indians) मधल्या मॅचमध्ये जेम्स नीशम (James Neesham) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) च्या जोडीने बाऊंड्री लाईनवर अशक्य वाटणारा कॅच पकडला.

  • Share this:

अबु धाबी, 2 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) ची प्रत्येक मॅचच प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी ठरते. कधी शेवटच्या बॉलवर संपणारी मॅच, तर कधी बॅट्समनची फटकेबाजी किंवा बॉलरनी टाकलेले स्टम्प उडवणारे यॉर्कर, प्रेक्षकांचं मनोरंजन कायमच होतं. अनेक वेळा बाऊंड्री लाईनवर फिल्डरनी पकडलेले अविस्मरणीय कॅच पाहूनही प्रेक्षक हैराण होतात. गुरुवारी पंजाब (Kings XI Punjab) आणि मुंबई (Mumbai Indians) मधल्या मॅचमध्येही असाच एक भन्नाट कॅच दर्शकांना पाहायला मिळाला.

पंजाबच्या जेम्स नीशम (James Neesham) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) च्या जोडीने बाऊंड्री लाईनवर अशक्य वाटणारा कॅच पकडला आणि रोहित शर्मा (Rohit Sharma)ला पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं. नीशम-मॅक्सवेलचा हा कॅच बघून रोहित शर्माही अवाक झाला.

मॅचच्या 17व्या ओव्हरला पंजाबचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) ने मोहम्मद शमी (Mohammad Shami)कडे बॉल दिला. त्यावेळी रोहित 44 बॉलमध्ये 70 रनवर खेळत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर रोहितने हल्ला केला. बॉल लॉन्ग ऑफ बाऊंड्रीच्या बाहेर जाऊन सिक्स मिळेल, असं वाटत असतानाच मॅक्सवेलने कमाल केली. बाऊंड्री लाईनवर मॅक्सवेलने बॉल पकडला आणि समोरच उभ्या असलेल्या नीशमच्या दिशेने फेकला. लॉन्ग ऑनवर उभ्या असलेल्या नीशमनेही कोणतीही चूक न करता बॉल पकडला.

मॅक्सवेल आणि नीशमने पकडलेल्या या कॅचची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होत आहे. मॅक्सवेल आणि नीशमला या मॅचमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही, पण त्यांनी पकडलेला कॅच मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published by: Shreyas
First published: October 2, 2020, 5:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या