Home /News /sport /

IPL 2020 : अय्यर-पंतने दिल्लीला सावरलं, फायनल जिंकण्यासाठी मुंबईला 157 रनचं आव्हान

IPL 2020 : अय्यर-पंतने दिल्लीला सावरलं, फायनल जिंकण्यासाठी मुंबईला 157 रनचं आव्हान

आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals) यांच्यात महामुकाबला होत आहे.

    दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) फायनल जिंकण्यासाठी दिल्ली (Delhi Capitals)ने मुंबई (Mumbai Indians)ला 157 रनचं आव्हान दिलं आहे. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण ट्रेन्ट बोल्टने या मॅचमध्येही दिल्लीला धक्के दिले. मार्कस स्टॉयनिस मॅचच्या पहिल्याच बॉलला आऊट झाला, यानंतर पुढच्याच ओव्हरला बोल्टने रहाणेला माघारी धाडलं. तर जयंत यादवने शिखर धवनला बोल्ड करून दिल्लीची अवस्था 22-3 अशी करुन ठेवली. यानंतर मात्र कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनी सूत्र हातात घेतली. या दोघांमध्ये 96 रनची पार्टनरशीप झाली. ऋषभ पंत 38 बॉलमध्ये 56 रन करून आऊट झाला, तर श्रेयस अय्यरने 50 बॉलमध्ये नाबाद 65 रन केल्या केल्या. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर कुल्टर-नाईलला 2 आणि जयंत यादवला 1 विकेट मिळाली. मागच्या मॅचवेळी दुखापत झालेला ट्रेन्ट बोल्ट या मॅचसाठी फिट झाल्यामुळे खेळत आहे. मुंबईने राहुल चहरऐवजी जयंत यादवला संधी दिली आहे. तर दिल्लीने टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. मुंबईची टीम रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर नाईल, जयंत यादव, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह दिल्लीची टीम शिखर धवन, मार्कस स्टॉयनिस, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शेमरन हेटमायर, ऋषभ पंत, अक्सर पटेल, आर. अश्विन, एनिरक नॉर्किया, कगिसो रबाडा, प्रविण दुबे मुंबईची आयपीएल फायनल खेळण्याची ही सहावी वेळ आहे. याआधी 4 वेळा मुंबईने आयपीएल स्पर्धा जिंकली होती, तर एका मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला होता. सर्वाधिकवेळा आयपीएल जिंकल्यामुळे मुंबई ही सगळ्यात यशस्वी टीम आहे. तर दुसरीकडे दिल्ली पहिल्यांदाच आयपीएल फायनलमध्ये खेळत आहे. या मोसमात झालेल्या तिन्ही मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला होता. तर आयपीएल इतिहासात या दोन्ही टीममध्ये एकूण 27 मॅच झाल्या आहेत, यातल्या 15 मॅचमध्ये मुंबईचा तर 12 मॅचमध्ये दिल्लीचा विजय झाला आहे. याआधी मुंबईने 2013, 2015, 2017 आणि 2019 यावर्षी आयपीएल जिंकली होती. आजच्या मॅचमध्ये विजय झाला तर लागोपाठ 2 आयपीएल जिंकण्याचं रेकॉर्ड मुंबईच्या नावावर होईल. याआधी चेन्नई (CSK) ने 2010 आणि 2011 या लागोपाठ दोन वर्षांमध्ये आयपीएल जिंकली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या