स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : मुंबईने 36 बॉलमध्ये कुटल्या 104 रन, बॉलरची धुलाई बघून कुंबळेही हताश

IPL 2020 : मुंबईने 36 बॉलमध्ये कुटल्या 104 रन, बॉलरची धुलाई बघून कुंबळेही हताश

आयपीएल (IPL 2020) मध्ये मुंबई (Mumbai Indians)ने पंजाब (Kings XI Punjab)ला धूळ चारली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) ने मुंबईचा डाव सावरला आणि मग कायरन पोलार्ड (Kieron Pollard) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने तुफान फटकेबाजी केली.

  • Share this:

अबु धाबी, 02 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये मुंबई (Mumbai Indians)ने पंजाब (Kings XI Punjab)ला धूळ चारली आहे. मुंबईने ठेवलेल्या 192 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 143 रनपर्यंत मजल मारता आली. या मॅचमध्ये पंजाबने टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करायचा निर्णय घेतला, त्यानंतर बॅटिंगला आलेल्या मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. मुंबईचा ओपनर क्विंटन डिकॉक शून्य रनवर माघारी परतला. पण पहिले रोहित शर्मा (Rohit Sharma) ने मुंबईचा डाव सावरला आणि मग कायरन पोलार्ड (Kieron Pollard) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने तुफान फटकेबाजी करत टीमला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)विरुद्ध जिंकलेली मॅच हरल्यानंतर पंजाबच्या बॉलरनी या मॅचमध्येही शेवटच्या काही ओव्हरमध्ये सुधारणा केली नाही. अबु धाबीच्या शेख झायद स्टेडियममध्ये बॉलरना मदत मिळत असली, तरी याचा फायदा घेणं पंजाबच्या बॉलरना शक्य झालं नाही. या मॅचमध्ये मुंबईच्या बॅट्समननी 10 सिक्स लगावले.

मॅचच्या सुरुवातीला पंजाबच्या बॉलरनी चांगली बॉलिंग केली. पहिल्याच ओव्हरला शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell)ने क्विंटन डिकॉकला खातंही उघडू न देता पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मधल्या ओव्हरमध्येही पंजाबच्या बॉलरनी मुंबईला रोखून धरलं. रोहित शर्माने 40 बॉलमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. पण शेवटच्या 6 ओव्हरमध्ये मुंबईने बाजी पलटवली.

शेवटच्या 6 ओव्हरमध्ये मुंबईचा कहर

रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच पंजाबच्या बॉलिंगवर हल्ला केला. रोहितने 16व्या ओव्हरमध्ये जिमी नीशमला 2 सिक्स आणि 2 फोर मारून एकूण 22 रन केले. पुढच्याच ओव्हरला रोहित आऊट झाला, पण मुंबईने आक्रमण सुरूच ठेवलं.

हार्दिक-पोलार्डची आतषबाजी

पोलार्ड-हार्दिक पांड्याने पंजाबच्या खराब बॉलिंगचा फायदा उचलत फक्त 23 बॉलमध्ये 67 रनची पार्टनरशीप केली. मुंबईच्या बॅट्समननी शेवटच्या 36 बॉलमध्ये 104 रन केले. यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्डने 9 सिक्स आणि 8 फोर मारले. मुंबईने पहिल्या 10 ओव्हरमध्ये फक्त 62 रन केले होते, पण 20 ओव्हरमध्ये मुंबईने 191 रनपर्यंत मजल मारली.

पंजाबचा कर्णधार केएल राहुलला अनुभव नसणंही टीमला महागात पडत आहे. राहुलने फास्ट बॉलर शेल्डन कॉट्रेलच्या ओव्हर आधीच संपवल्या आणि शेवटची ओव्हर ऑफ स्पिनर कृष्णप्पा गौतमला दिली. गौतमच्या शेवटच्या ओव्हरच्या 6 बॉलपैकी 4 बॉलवर पोलार्ड-हार्दिकने स्किस लगावले. आपल्या बॉलरची धुलाई बघून पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेही हताश दिसत होते.

Published by: Shreyas
First published: October 2, 2020, 7:35 AM IST

ताज्या बातम्या