IPL 2020 : असं आहे मुंबईचं आयपीएल फायनलमधलं रेकॉर्ड

IPL 2020 : असं आहे मुंबईचं आयपीएल फायनलमधलं रेकॉर्ड

मुंबई (Mumbai Indians)ने आणखी एका आयपीएल (IPL 2020) फायनलमध्ये धडक मारली आहे. यंदाच्या मोसमातल्या पहिल्या प्ले-ऑफमध्ये मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)चा 57 रननी पराभव केला.

  • Share this:

दुबई, 5 नोव्हेंबर : मुंबई (Mumbai Indians)ने आणखी एका आयपीएल (IPL 2020) फायनलमध्ये धडक मारली आहे. यंदाच्या मोसमातल्या पहिल्या प्ले-ऑफमध्ये मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)चा 57 रननी पराभव केला. याचसोबत मुंबईने आयपीएलच्या 13 हंगामातली सहावी फायनल गाठली आहे. याआधीच्या 5 फायनलपैकी 4 वेळा मुंबईने विजय मिळवला, तर एका फायनलमध्ये त्यांच्या पदरी निराशा आली.

2010 फायनल

2010 साली मुंबईने पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता, पण चेन्नईने मुंबईचा 22 रनने पराभव केला होता. या पराभवानंतर मात्र मुंबईने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2013, 2015, 2017 आणि 2019 सालच्या फायनलमध्ये मुंबईने विजयाला गवसणी घातली.

2013 फायनल

2010 फायनलच्या पराभवाचा बदला मुंबईने 2013 साली घेतला. या मॅचमध्ये मुंबईने चेन्नईचा 23 रनने पराभव केला. कायरन पोलार्डला या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या मोसमाच्या मध्यावरच मुंबईने रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली. यानंतर लगेचच मुंबईने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

2015 फायनल

रोहितच्या नेतृत्वात मुंबईला 2015 साली दुसऱ्यांदा आयपीएल जिंकता आली. 2015 सालीही मुंबईने पुन्हा एकदा चेन्नईलाच धूळ चारली. कोलकात्याच्या इडन गार्डनमध्ये झालेल्या या मॅचमध्ये मुंबईचा 41 रनने विजय झाला. 26 बॉलमध्ये 50 रनची खेळी करणाऱ्या रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं होतं.

2017 फायनल

2017 सालच्या रोमांचक अशा फायनलमध्ये मुंबईने पुण्याचा शेवटच्या बॉलवर पराभव केला होता. मिचेल जॉनसनने टाकलेल्या शेवटच्या भन्नाट ओव्हरमुळे मुंबईला आणखी एक आयपीएल जिंकता आली. कृणाल पांड्याला या मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं.

2019 फायनल

2019 सालची फायनलही 2017 प्रमाणेच रोमांचक झाली. यावर्षीही मुंबईचा सामना चेन्नईसोबतच झाला. शेवटच्या बॉलवर 2 रनची गरज असताना लसिथ मलिंगाने शार्दुल ठाकूरला एलबीडब्ल्यू करून मुंबईला चौथं जेतेपद पटकवून दिलं. 4 ओव्हरमध्ये फक्त 14 रन करून 2 विकेट घेणारा जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द मॅच ठरला होता.

मुंबई सगळ्यात यशस्वी

आयपीएल इतिहासात 4 वेळा ट्रॉफी पटकवणारी मुंबई ही एकमेव टीम आहे. मुंबईनंतर चेन्नईने 2010, 2011 आणि 2018 अशा 3 वर्ष आयपीएल जिंकली. तर कोलकात्याने 2012 आणि 2014 साली आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

Published by: Shreyas
First published: November 5, 2020, 11:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या