IPL 2020 : मुंबईची तुफान फटकेबाजी, दिल्लीला 201 रनचं मोठं आव्हान

IPL 2020 : मुंबईची तुफान फटकेबाजी, दिल्लीला 201 रनचं मोठं आव्हान

आयपीएल (IPL 2020)च्या पहिल्या प्ले-ऑफमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा सामना दिल्ली (Delhi Capitals)विरुद्ध होत आहे. या मॅचमध्ये मुंबईच्या बॅट्समननी तुफान फटकेबाजी केली आहे.

  • Share this:

दुबई, 5 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या पहिल्या प्ले ऑफमध्ये मुंबईच्या बॅट्समननी तुफान फटकेबाजी करत दिल्लीला 201 रनचं मोठं आव्हान दिलं आहे. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच बॉलला आऊट झाला. पण क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमार यादवने आक्रमक बॅटिंग सुरूच ठेवली. तर कृणाल पांड्या आणि कायरन पोलार्ड स्वस्तात आऊट झाले. पण इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी शेवटच्या काही ओव्हरमध्ये मोठे फटके मारले आणि मुंबईला 200 रनपर्यंत पोहोचवलं. इशान किशनने 30 बॉलमध्ये नाबाद 55 रन तर हार्दिक पांड्याने 14 बॉलमध्ये नाबाद 37 रन केले. सूर्यकुमार यादवने 38 बॉलमध्ये 51 आणि क्विंटन डिकॉकने 25 बॉलमध्ये 40 रन केले. दिल्लीकडून अश्विनला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर एनरिक नॉर्किया आणि मार्कस स्टॉयनिस यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

आयपीएल (IPL 2020)च्या पहिल्या प्ले-ऑफमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा सामना दिल्ली (Delhi Capitals)विरुद्ध होत आहे. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईने या मॅचसाठी टीममध्ये 3 बदल केले आहेत. बुमराह, बोल्ट आणि हार्दिक पांड्या यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे, तर पॅटिनसन, धवल कुलकर्णी आणि सौरभ तिवारी यांना बाहेर ठेवण्यात आलं आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम पहिल्या तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर होती. लिग स्टेजमध्ये झालेल्या दोन्ही मॅचमध्ये मुंबईने दिल्लीचा पराभव केला होता. आजच्या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल, ती टीम थेट फायनल गाठेल, तर पराभव झालेली टीम बँगलोर आणि हैदराबाद यांच्यात विजयी झालेल्या टीमसोबत खेळेल. या मॅचमध्ये विजय मिळवलेली टीम फायनलमध्ये पोहोचेल.

मुंबईची टीम

रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर नाईल, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह

दिल्लीची टीम

पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, डॅनियल सॅम्स, अक्सर पटेल, आर. अश्विन, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्किया

Published by: Shreyas
First published: November 5, 2020, 7:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या