IPL 2020 : ठरलं! मुंबई या दिवशी खेळणार प्ले-ऑफचा सामना

IPL 2020 : ठरलं! मुंबई या दिवशी खेळणार प्ले-ऑफचा सामना

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी मुंबई (Mumbai Indians) ही पहिली टीम ठरली. त्यानंतर आता मुंबईच्या प्ले-ऑफ (Play off) ची तारीखही ठरली आहे.

  • Share this:

दुबई, 31 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी मुंबई (Mumbai Indians) ही पहिली टीम ठरली. प्ले-ऑफच्या उरलेल्या 3 टीमसाठी अजूनही 6 टीममध्ये स्पर्धा सुरू आहे, तर चेन्नई प्ले-ऑफच्या शर्यतीमधून बाहेर झालेली एकमेव टीम आहे. मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)चा पराभव केल्यानंतर आता ते पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोनपैकी एका क्रमांकावर कायम राहतील हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबईच्या पहिल्या प्ले-ऑफची तारीखही ठरली आहे.

5 नोव्हेंबरला मुंबई प्ले-ऑफचा सामना खेळणार आहे, पण हा सामना कोणत्या टीमविरुद्ध होणार हे मात्र अजून स्पष्ट झालं नाही. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई जर पहिल्या क्रमांकावर राहिली तर दुसऱ्या क्रमांकाच्या टीमशी किंवा मुंबई दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर पहिल्या क्रमांकाच्या टीमशी मुंबईचा सामना होईल.

5 नोव्हेंबरला होणाऱ्या या सामन्यात जर मुंबईचा पराभव झाला तर त्यांना फायनलला पोहोचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. प्ले-ऑफचा पहिला सामना मुंबईने गमावला तर त्यांचा दुसरा सामना 8 नोव्हेंबरला होईल. ही मॅचही मुंबईने गमावली तर मात्र त्यांना फायनलला प्रवेश मिळणार नाही. दुसरीकडे मुंबईने 5 नोव्हेंबरला होणाऱ्या क्वालिफायर-1 च्या मॅचमध्ये विजय मिळवला, तर ते थेट फायनलला प्रवेश करतील. 10 नोव्हेंबरला दुबईमध्ये आयपीएलची फायनल होणार आहे.

प्ले-ऑफच्या आधी मुंबईची ग्रुप स्टेजमधली आणखी एक मॅच बाकी आहे. 3 नोव्हेंबरला हैदराबादविरुद्ध मुंबई यांच्यात शारजाहमध्ये मॅच होणार आहे. या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी मुंबईच्या भवितव्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मुंबईने 13 पैकी 9 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. 18 पॉईंट्ससह मुंबई सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.

प्ले-ऑफची स्पर्धा

प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आता उरलेल्या 3 जागांसाठी 6 टीममध्ये स्पर्धा आहे. बँगलोर, दिल्ली, पंजाब, राजस्थान, कोलकाता, हैदराबाद या टीम प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी लढत आहेत. 14 पॉईंट्ससह बँगलोर आणि हैदराबाद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर पंजाब, राजस्थान, कोलकाता आणि हैदराबाद यांच्या खात्यात प्रत्येकी 12 पॉईंट्स आहेत.

Published by: Shreyas
First published: October 31, 2020, 8:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading