Home /News /sport /

IPL 2020 : राहुल-मयंकचं वादळ रोखण्यासाठी मुंबईची रणनिती तयार

IPL 2020 : राहुल-मयंकचं वादळ रोखण्यासाठी मुंबईची रणनिती तयार

आयपीएल (IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)चा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)विरुद्ध होणार आहे.

    दुबई, 1 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)चा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)विरुद्ध होणार आहे. या सामन्यात केएल राहुल (KL Rahul)आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)या दोघांना रोखण्याचं आव्हान मुंबईच्या बॉलरपुढे असणार आहे. केएल राहुलने या मोसमातल्या 3 मॅचमध्ये 222 रन केल्या आहेत. राहुलने यंदा 21, नाबाद 132 आणि 69 रनची खेळी केली. त्यामुळे राहुल आता मुंबई इंडियन्सच्या बॉलरच्या रडारवर असणार आहे. पंजाबविरुद्धच्या मॅचआधी मुंबईचे बॉलिंग प्रशिक्षक शेन बॉण्डने त्यांच्या रणनितीबाबत माहिती दिली. केएल राहुलची विकेट लवकर घेऊन पंजाबवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आम्ही करू, असं बॉण्ड म्हणाला. राहुलसोबतच पंजाबचा दुसरा ओपनर मयंक अग्रवालची कामगिरीही जबरदस्त झाली आहे. या दोन्ही खेळाडूंनी यंदा एक-एक शतक आणि एक-एक अर्धशतक केलं आहे. आतापर्यंत झालेल्या 3 मॅचमध्ये राहुलने 222 आणि मयंकने 221 रन केले आहेत. मॅचआधी मुंबईचा बॉलिंग प्रशिक्षक शेन बॉण्ड म्हणाला, 'राहुलने आमच्याविरुद्धही मागच्या काही मॅचमध्ये रन केले आहेत. तो एक जबरदस्त खेळाडू आहे. आम्ही त्यांच्याकडून चांगल्या खेळणाऱ्या खेळाडूंसाठी रणनिती तयार करत आहोत. केएल राहुल उत्कृष्ठ खेळाडू आहे आणि तो चारही बाजूंनी रन करू शकतो.' 'राहुल मधल्या ओव्हरमध्ये वेळ घेतो, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे अशावेळी त्याच्यासोबत खेळणाऱ्या खेळाडूंवर दबाव टाकण्याची चांगली संधी असते. पण आम्ही राहुलला आऊट करण्यासाठी खास रणनिती आखत आहोत. त्यामुळे आम्ही त्याला तो जिकडे मजबूत आहे, तिकडून रन काढून देणार नाही. एक्स्ट्रॉ कव्हर आणि फाईन लेगवरून तो जास्त रन करतो. आमच्याकडे चांगले बॉलर आहेत, जे राहुल आणि मयंकवर दबाव टाकू शकतात', अशी प्रतिक्रिया बॉण्डने दिली. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या मागच्या 3 मॅचमध्ये राहुलने 88.3 च्या सरासरीने 265 रन केले आहेत. यामध्ये 94, 71, आणि 100 रनचा समावेश आहे. त्याआधी आरसीबीकडून खेळताना राहुलने अनेक विक्रम केले होते. राहुल आयपीएलमध्ये सगळ्यात जलद 2 हजार रन पूर्ण करणारा भारतीय खेळाडू आहे. सोबतच कर्णधार आणि भारतीय खेळाडू म्हणून सर्वाधिक स्कोअर करण्याचा विक्रमही राहुलच्या नावावर आहे. 'राहुल आणि मयंकवर दबाव टाकून त्यांना लवकर आऊट केलं, तर त्यांच्या मधल्या फळीवर दबाव येऊ शकतो आणि त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं जाऊ शकतं. आमच्या बॅटिंगबाबत आत्मविश्वास आहे, आम्हीही मोठा स्कोअर उभारू शकतो. आतापर्यंत खेळलेल्या मॅचमध्ये आमची बॅटिंग कठीण होती. या मैदानात आम्ही दोन मॅच खेळल्या आहेत, त्यामुळे परिस्थिती जाणून घेण्यात आम्हाला नक्कीच मदत होईल,' असा विश्वास बॉण्डने व्यक्त केला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2020, Kl rahul, Mumbai Indians

    पुढील बातम्या