स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : पोलार्ड, पांड्या, रोहितची तुफान फटकेबाजी, पंजाबला 192 रनचं आव्हान

IPL 2020 : पोलार्ड, पांड्या, रोहितची तुफान फटकेबाजी, पंजाबला 192 रनचं आव्हान

पोलार्ड, पांड्या आणि रोहित शर्माच्या फटेबाजीमुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)ने पंजाब (Kings XI Punjab)ला 192 रनचं आव्हान दिलं आहे.

  • Share this:

अबु धाबी, 1 ऑक्टोबर : पोलार्ड, पांड्या आणि रोहित शर्माच्या फटेबाजीमुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)ने पंजाब (Kings XI Punjab)ला 192 रनचं आव्हान दिलं आहे. या मॅचमध्ये पंजाबने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. शून्य रनवरच मुंबईला क्विंटन डिकॉकच्या रुपात पहिला धक्का बसला.

डिकॉक आऊट झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही 10 रन करून माघारी परतला. पण रोहित शर्माने दुसरीकडून किल्ला लढवला. रोहितने 45 बॉलमध्ये 70 रन केले. तर मागच्या मॅचचा हिरो इशान किशन 32 बॉलमध्ये 28 रन करून आऊट झाला. यानंतर कायरन पोलार्ड (Kieron Pollard)आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya)ने पंजाबच्या बॉलची धुलाई केली.

कायरन पोलार्डने 20 बॉलमध्ये 47 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 3 फोरचा समावेश होता. तर हार्दिक पांड्याने 11 बॉलमध्ये 30 रन केले. हार्दिकनेही त्याच्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीमध्ये 3 फोर आणि 2 सिक्स लगावले. पोलार्ड आणि पांड्याने 20व्या ओव्हरमध्ये कृष्णप्पा गौतमला 25 रन मारले, यात 4 सिक्सचा समावेश होता. मुंबईने शेवटच्या 6 ओव्हरमध्ये तब्बल 104 रनची आतषबाजी केली.

पंजाबकडून शेल्डन कॉट्रेल, मोहम्मद शमी आणि कृष्णप्पा गौतमला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. कॉट्रेलने त्याच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 20 रन दिले.

Published by: Shreyas
First published: October 1, 2020, 9:45 PM IST

ताज्या बातम्या