IPL 2020 : मुंबईचा सलग दुसरा विजय, हैदराबादला हरवून पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल

IPL 2020 : मुंबईचा सलग दुसरा विजय, हैदराबादला हरवून पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)चा सलग दुसरा विजय झाला आहे. याचसोबत मुंबईने पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल स्थान गाठलं आहे.

  • Share this:

शारजाह : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)चा सलग दुसरा विजय झाला आहे. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)चा 34 रनने पराभव करत मुंबईने पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल स्थान गाठलं आहे. मुंबईच्या 209 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 174/7 पर्यंत मजल मारता आली.

मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सनने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर कृणाल पांड्याला 1 विकेट मिळाली. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 60 रनची खेळी केली.

या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 208 रनपर्यंत मजल मारली. क्विंटन डिकॉकने 39 बॉलमध्ये 67 रन केले. पांड्या बंधू आणि पोलार्डने मुंबईला 200च्या पुढे नेण्यात मदत केली. कृणाल पांड्याने 4 बॉलमध्येच 500 च्या स्ट्राईक रेटने 20 रन काढले. तर पोलार्डने 13 बॉलमध्ये 25 आणि हार्दिक पांड्याने 19 बॉलमध्ये 28 रनची खेळी केली.

Published by: Shreyas
First published: October 4, 2020, 7:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या