Home /News /sport /

IPL 2020 : मुंबईचा राजस्थानवर 'हल्लाबोल', 5 वर्षांनंतर पराभवाचा वचपा काढला

IPL 2020 : मुंबईचा राजस्थानवर 'हल्लाबोल', 5 वर्षांनंतर पराभवाचा वचपा काढला

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबईने विजयाची हॅट्रिक नोंदवली आहे. राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा तब्बल 57 रननी विजय झाला आहे.

    अबु धाबी, 6 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबईने विजयाची हॅट्रिक नोंदवली आहे. राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा तब्बल 57 रननी विजय झाला आहे. याचसोबत मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबईने ठेवलेल्या 194 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 18.1 ओव्हरमध्ये 136 रनवर ऑलआऊट झाला. मुंबईने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली. 12 रनवरच राजस्थानचे 3 बॅट्समन तंबूत परतले होते. पण जॉस बटलरने मात्र दुसऱ्या बाजूने आक्रमण सुरूच ठेवलं. 44 बॉलमध्ये 77 रन करून बटलर आऊट झाला. मुंबईकडून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. ट्रेन्ट बोल्टला 2 आणि जेम्स पॅटिनसनला 2 विकेट, तर राहुल चहर आणि कायरन पोलार्डला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर रोहित आणि क्विंटन डिकॉक यांनी मुंबईला चांगली सुरूवात करुन दिली. या दोघांनी 4.5 ओव्हरमध्येच 49 रन केले, पण डिकॉकची विकेट गेल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav)ने नाबाद अर्धशतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवने 47 बॉलमध्ये 79 रन आणि हार्दिक पांड्याने 19 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले. मुंबईला राजस्थानविरुद्ध 5 वर्षानंतर पहिल्यांदाच विजय मिळाला आहे. याआधी 2015 साली मुंबईने राजस्थानचा पराभव केला होता. त्यानंतर 2016 आणि 2017 साली राजस्थानच्या टीमवर बंदी घालण्यात आली होती. 2018 आणि 2019 साली झालेल्या चारही मॅचमध्ये राजस्थानने मुंबईला नमवलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या