स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : मुंबईचा पंजाबवर दणदणीत विजय, पॉईंट्स टेबलमध्येही मोठी उडी

IPL 2020 : मुंबईचा पंजाबवर दणदणीत विजय, पॉईंट्स टेबलमध्येही मोठी उडी

आयपीएल (IPL 2020)च्या पंजाब (Kings XI Punjab)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा दणदणीत विजय झाला आहे.

  • Share this:

अबु धाबी, 1 ऑक्टोबर :  आयपीएल (IPL 2020)च्या पंजाब (Kings XI Punjab)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा  48 रननी दणदणीत विजय झाला आहे. मुंबईने ठेवलेल्या 192 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 143/8 पर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून निकोलास पूरनने 27 बॉलमध्ये सर्वाधिक 44 रन केले. तर मुंबईकडून बुमराह, राहुल चहर आणि पॅटिन्सनला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. कृणाल पांड्या आणि ट्रेन्ट बोल्टला प्रत्येकी 1 विकेट मिळवण्यात यश आलं.

त्याआधी बॅटिंग करताना मुंबईने 20 ओव्हरमध्ये 191 रनपर्यंत मजल मारली. या मॅचमध्ये पंजाबने टॉस जिंकून मुंबईला पहिले बॅटिंगसाठी बोलावलं, पण मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. क्विंटन डिकॉक शून्य रनवर आऊट झाला, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवलाही मोठी खेळी करता आली नाही. वाईट सुरुवातीनंतर मुंबईला मोठी धावसंख्या उभारता येणार नाही, असं वाटत होतं. पण हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्डने तुफान फटकेबाजी केली. या दोघांनी शेवटच्या 6 ओव्हरमध्ये 104 रन कुटले.

पोलार्डने 20 बॉलमध्ये 47 आणि हार्दिक पांड्याने 11 बॉलमध्ये 33 रन केले. कर्णधार रोहित शर्माने 45 बॉलमध्ये 70 रनची खेळी केली. पंजाबकडून कॉट्रेल, शमी आणि गौतमला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

या विजयासोबतच मुंबई पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल क्रमांकावर पोहोचली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 4 मॅचपैकी 2 मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला, त्यामुळे त्यांच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत. चेन्नईविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला होता, तर बैंगलोरविरुद्धची मॅच मुंबईला सुपर ओव्हरमध्ये गमवावी लागली होती. पंजाबआधी कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईला विजय मिळाला होता.

Published by: Shreyas
First published: October 1, 2020, 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading