Home /News /sport /

IPL 2020 : तगड्या दिल्लीवर मुंबई भारी! पॉईंट्स टेबलमध्येही रोहितची टीम अव्वल

IPL 2020 : तगड्या दिल्लीवर मुंबई भारी! पॉईंट्स टेबलमध्येही रोहितची टीम अव्वल

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातली सगळ्यात तगडी टीम असणाऱ्या दिल्ली (Delhi Capitals)चा मुंबई (Mumbai Indians)ने पराभव केला आहे.

    अबु धाबी, 11 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातली सगळ्यात तगडी टीम असणाऱ्या दिल्ली (Delhi Capitals)चा मुंबई (Mumbai Indians)ने पराभव केला आहे. याचसोबत आयपीएलच्या अर्ध्या मोसमानंतर मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल स्थानावर पोहोचली आहे. दिल्लीने ठेवलेलं 163 रनचं लक्ष्य मुंबईने 2 बॉल राखून पूर्ण केलं. दिल्लीने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार आणि ओपनर रोहित शर्मा फक्त 5 रन करुन आऊट झाला. पण क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकामुळे मुंबईना हा सामना जिंकला. क्विंटन डिकॉकने 36 बॉलमध्ये 53 रन केले, तर सूर्यकुमार यादवनेही 32 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली. इशान किशनने 15 बॉल 28 तर पोलार्डने नाबाद 11 आणि कृणाल पांड्याने नाबाद 12 रन केले. दिल्लीकडून रबाडाने 2 विकेट घेतल्या, तर अक्सर पटेल, अश्विन आणि स्टॉयनिसला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण मुंबईप्रमाणेच दिल्लीची सुरुवातही खराब झाली. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे स्वस्तात आऊट झाले. पण शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव सावरला. शिखर धवनने 52 बॉलमध्ये नाबाद 69 रन केले. मुंबईकडून कृणाल पांड्याला 2 आणि ट्रेन्ट बोल्टला 1 विकेट मिळाली. या विजयासोबतच मुंबईने पॉईंट्स टेबलमध्येही दिल्लीला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या 7 मॅचपैकी 5 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला, तर त्यांना 2 मॅचमध्ये पराभूत व्हावं लागलं. दिल्लीनेही मुंबई प्रमाणेच 7 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत, पण मुंबईचा नेट रनरेट दिल्लीपेक्षा चांगला असल्यामुळे मुंबई पहिल्या आणि दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या