IPL 2020 : मुंबईने चेन्नईला लोळवलं, धोनीचं प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

IPL 2020 : मुंबईने चेन्नईला लोळवलं, धोनीचं प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

इशान किशन आणि क्विंटन डिकॉकच्या नाबाद शतकी पार्टनरशीपमुळे मुंबई (Mumbai Indians)ने चेन्नई (CSK)ला पराभवाची धूळ चारली आहे.

  • Share this:

शारजाह, 23 ऑक्टोबर : इशान किशन आणि क्विंटन डिकॉकच्या नाबाद शतकी पार्टनरशीपमुळे मुंबई (Mumbai Indians)ने चेन्नई (CSK)ला पराभवाची धूळ चारली आहे. ओपनिंगला आलेल्या ईशान किशन आणि क्विंटन डिकॉकने 116 रनची नाबाद पार्टनरशीप केली. इशान किशनने 37 बॉलमध्ये नाबाद 68 रन केले, तर डिकॉक 37 बॉलमध्ये 46 रनवर नाबाद राहिला.

टॉस जिंकून मुंबईने पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये मुंबई कर्णधार रोहित शर्माऐवजी मैदानात उतरली होती. रोहितऐवजी कायरन पोलार्डकडे मुंबईचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. पहिले बॉलिंग करणाऱ्या मुंबईने सुरुवातीपासूनच चेन्नईला धक्के दिले. चेन्नईची अवस्था 3 रनवर 4 आऊट अशी झाली होती. ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी सुरुवातीच्या 4 विकेट घेतल्या. पण सॅम करनने एका बाजूने किल्ला लढवला. करनने 47 बॉलमध्ये 52 रन केले.

मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर बुमराह आणि राहुल चहरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. नॅथन कुल्टर नाईलला 1 विकेट घेण्यात यश आलं. या विजयासह मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबई, दिल्ली आणि बँगलोर यांच्या खात्यात आता 14 पॉईंट्स असले, तरी मुंबईचा नेट रनरेट या दोन्ही टीमपेक्षा चांगला आहे. दुसरीकडे चेन्नईचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्न आता भंगलं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम शेवटच्या क्रमांकावर आहे.

Published by: Shreyas
First published: October 23, 2020, 10:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या