IPL 2020 : सूर्या पुन्हा चमकला, बँगलोरला हरवून मुंबई प्ले-ऑफच्या दरवाज्यात

IPL 2020 : सूर्या पुन्हा चमकला, बँगलोरला हरवून मुंबई प्ले-ऑफच्या दरवाज्यात

IPL 2020 सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई (Mumbai Indians)ने बँगलोर (RCB)चा 5 विकेटने पराभव केला आहे.

  • Share this:

अबु धाबी, 28 ऑक्टोबर : सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई (Mumbai Indians)ने बँगलोर (RCB)चा 5 विकेटने पराभव केला आहे. बँगलोरने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून क्विंटन डिकॉक आणि इशान किशन ओपनिंगला बॅटिंगसाठी आले. या दोघांनाही चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सूर्यकुमार यादवने मात्र एकहाती किल्ला लढवत मुंबईला विजय मिळवून दिला. सूर्या (Suryakumar Yadav) ने 43 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले, यामध्ये 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. बँगलोरकडून मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल याला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर क्रिस मॉरिसने 1 विकेट घेतली.

या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर देवदत्त पडिकल आणि जॉश फिलिप यांनी बँगलोरला चांगली सुरुवात करुन दिली. या दोघांनी 7.5 ओव्हरमध्येच 71 रन केले. पण यानंतर मुंबईच्या बॉलरनी जोरदार पुनरागमन करत बँगलोरला 164 रनवर रोखलं. जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 14 न देऊन 3 विकेट घेतल्या. तर बोल्ट, चहर आणि पोलार्डला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

बँगलोरविरुद्धच्या या विजयासोबतच मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईने 12 पैकी 8 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे बँगलोर पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 12 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 5 मॅच त्यांना गमवाव्या लागल्या आहेत.

Published by: Shreyas
First published: October 28, 2020, 11:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या