Home /News /sport /

IPL 2020 : चेन्नईची पराभवाची हॅट्रिक, 'कॅप्टन कूल' धोनीही संतापला, खेळाडूंना भरला दम

IPL 2020 : चेन्नईची पराभवाची हॅट्रिक, 'कॅप्टन कूल' धोनीही संतापला, खेळाडूंना भरला दम

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)ची कामगिरी निराशाजनक झाली आहे.

    अबु धाबी, 3 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)ची कामगिरी निराशाजनक झाली आहे. एमएस धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईच्या टीमने यंदाच्या मोसमात एकूण 4 मॅच खेळल्या आहेत. यापैकी मुंबईविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला, यानंतर झालेल्या तिन्ही मॅचमध्ये चेन्नईला पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्येही चेन्नईची टीम शेवटच्या म्हणजेच 8व्या क्रमांकावर आहे. शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादने चेन्नईचा 7 रनने पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार एमएस धोनी चांगलाच नाराज झाला. टीमकडून एकसारख्या त्याच त्याच चुका होत आहेत. कॅच सोडल्यामुळेही आमचं नुकसान होत आहे, असं एमएस धोनी म्हणाला. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईची फिल्डिंगही कमकुवत झाली. 18व्या ओव्हरमध्ये चेन्नईने अभिषेक शर्माचे 2 कॅच सोडले. पहिले रविंद्र जडेजाने आणि मग शार्दुल ठाकूरने अभिषेकला आऊट करण्याची संधी गमावली. धोनीने दम भरला 'आम्ही लागोपाठ तीन मॅच बहुतेक पहिल्यांदाच हरलो आहोत. आम्हाला चुका सुधाराव्या लागतील. कॅच सोडणं, नो बॉल टाकणं, आम्ही सारख्या त्याच-त्याच चुका करत आहोत. तुम्ही सारख्या त्याच चुका करु शकत नाही,' असा दमच धोनीने चेन्नईच्या टीमला भरला आहे. नॉक आऊट मॅच असती तर? '16 ओव्हरनंतरच्या 2 ओव्हर आमच्यासाठी खराब होत्या. कॅच कोणीही सोडू इच्छित नाही, पण या स्तरावर तुम्हाला कॅच पकडावे लागतात. अशाप्रकारे कॅच सोडणं तुमच्या नॉक आऊट मॅचसाठी नुकसान करु शकतं,' अशी प्रतिक्रिया धोनीने दिली. पुनरागमन करू तीन मॅचमध्ये पराभव झाला असला, तरी आम्ही पुनरागमन करू, असा विश्वास धोनीने व्यक्त केला. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईच्या टीमने बॉलिंग करताना चांगली सुरुवात केली होती. हैदराबादची अवस्था 69-4 अशी झाली होती. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे आणि केन विलियमसन हे दिग्गज खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते, पण युवा खेळाडू प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादचा डाव सावरला आणि त्यांना 164 रनपर्यंत पोहोचवलं. प्रियम गर्गने 26 बॉलमध्ये 51 रनची खेळी केली. तर अभिषेकने 31 रन केले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या