मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : मुंबईसमोर धोनीचं 'पुणेकर' ट्रम्पकार्ड फेल

IPL 2020 : मुंबईसमोर धोनीचं 'पुणेकर' ट्रम्पकार्ड फेल

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातली चेन्नई (CSK)ची खराब कामगिरी कायम आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्येही चेन्नईची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. धोनी (MS Dhoni) ने विश्वास टाकलेलं पुणेकर ट्रम्पकार्डही यंदाच्या मोसमात फेल ठरत आहे,

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

शारजाह, 23 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमातली चेन्नई (CSK)ची खराब कामगिरी कायम आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्येही चेन्नईची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. चेन्नईच्या सुरुवातीच्या 4 विकेट फक्त 3 रनवरच गेल्या. ऋतुराज गायकवाड, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायुडू आणि एन. जगदीशन हे खेळाडू एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनमध्ये परतले. ट्रेन्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी चेन्नईच्या प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)ने टीममध्ये तीन बदल केले. केदार जाधव, शेन वॉटसन, पियुष चावला यांच्याऐवजी एन जगदीशन, ऋतुराज गायकवाड आणि इम्रान ताहिर यांना संधी दिली. या मॅचमध्ये मूळचा पुणेकर असलेला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) फाफ डुप्लेसिसबरोबर ओपनिंगला आला होता. पण या मॅचमध्ये त्याला चमक दाखवता आली नाही. ऋतुराज गायकवाड 5 बॉलमध्ये शून्य रन करून माघारी परतला. ट्रेन्ट बोल्टने त्याची विकेट घेतली.

यंदाच्या मोसमात ऋतुराज गायकवाडला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. राजस्थानविरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्येही ऋतुराज गायकवाड पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता. तर दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये त्याने 10 बॉलमध्ये 5 रन करता आले होते. यंदाच्या संपूर्ण मोसमात खेळलेल्या 3 मॅचमध्ये त्याला फक्त 5 रनच करता आल्या आहेत.

ऋतुराज गायकवाडने स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने रन काढल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 21 मॅचमध्ये 38.54 च्या सरासरीने 1,349 रन केले आहेत, यामध्ये 4 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तर लिस्ट ए (मर्यादित ओव्हर) मध्ये त्याने 54 मॅचमध्ये 49 च्या सरासरीने 2,499 रन केले. ऋतुराजने लिस्ट-ए कारकिर्दीमध्ये 6 शतकं आणि 16 अर्धशतकं झळकावली आहेत. तर स्थानिक टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 30 मॅचमध्ये 31.40 च्या सरासरीने आणि 133.75 च्या स्ट्राईक रेटने 848 रन केले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये ऋतुराजच्या नावावर 6 अर्धशतकं आहेत.

एमएस धोनीचा विश्वासू असलेला दुसरा पुणेकर म्हणजे केदार जाधवनेही यावर्षी निराशा केली. केदार जाधवने 8 मॅचच्या 5 इनिंगमध्ये 20.66 ची सरासरी आणि 93.93च्या स्ट्राईक रेटने 62 रन केले. यंदाच्या मोसमातला त्याचा सर्वाधिक स्कोअर 26 रन आहे.

First published: