IPL 2020 : धोनी नव्या अवतारात ! 'माही'चा हा लूक बघितलात का?

IPL 2020 : धोनी नव्या अवतारात ! 'माही'चा हा लूक बघितलात का?

आयपीएल (IPL 2020)च्या बैंगलोर (RCB) च्या मॅचआधी चेन्नई (CSK)चा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)चा नवा लूक समोर आला आहे.

  • Share this:

दुबई, 10 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)मध्ये आज बैंगलोर (RCB)चा सामना चेन्नई (CSK)सोबत होत आहे. या मॅचआधी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी नव्या लूकमध्ये दिसला आहे. मॅचआधी दुबईच्या मैदानात येत असतानाचे धोनीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये धोनीने त्याची हेयरस्टाईल बदलली आहे, तसंच त्याने दाढीही काढून टाकली आहे. धोनीचा हा बदललेला लूक चेन्नईचं नशीबही बदलणार का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईची कामगिरी खराब झाली आहे. चेन्नईने यंदाच्या मोसमात खेळलेल्या 6 मॅचपैकी फक्त 2 मॅच जिंकल्या आहेत, तर 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचायचं असेल, तर आता चेन्नईला त्यांची कामगिरी सुधारावी लागणार आहे. आयपीएल इतिहासात आतापर्यंत चेन्नईने खेळलेल्या सगळ्या मोसमात चेन्नई प्ले-ऑफमध्ये पोहोचली आहे. सगळ्या आयपीएलमध्ये प्ले-ऑफपर्यंत मजल मारणारी चेन्नई ही एकमेव टीम आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरुवात मुंबई आणि चेन्नई यांच्यातल्या मॅचने झाली होती. त्यामॅचवेळीही धोनी नव्या लूकमध्ये समोर आला होता. धोनीची नवी हेयरस्टाईल आणि दाढीच्या कटचे फोटो तेव्हाही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. धोनीची पत्नी साक्षीनेही धोनीचा हा लूक इन्स्टाग्रामवर शेयर केला होता.

तब्बल 14 महिन्यांच्या विश्रांतीनंतर धोनी क्रिकेटच्या मैदानात पुन्हा दिसला. या मधल्या काळात धोनीचे पिकलेले केस आणि पिकलेल्या दाढीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आयपीएलमध्ये मात्र धोनी केसांना आणि दाढीला रंग लावून पुन्हा एकदा जुन्या रुपात दिसायला लागला. आयपीएलसाठी वजन कमी करण्यासाठी धोनीने जीममध्ये प्रचंड मेहनत घेतल्याचंही त्याच्या फिटनेसवरुन दिसत आहे.

Published by: Shreyas
First published: October 10, 2020, 7:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या