Home /News /sport /

IPL 2020 : कॅप्टन कूल धोनीचा स्वॅग! गेलला दाखवली त्याचीच 'स्टाईल', पाहा VIDEO

IPL 2020 : कॅप्टन कूल धोनीचा स्वॅग! गेलला दाखवली त्याचीच 'स्टाईल', पाहा VIDEO

आयपीएल (IPL 2020)ने क्रिकेटला फक्त जास्त रोमांचकच बनवलं नाही, तर वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेटपटूंना आणखी जवळ आणलं आहे. आयपीएलमुळे जगातल्या क्रिकेटपटूंची एकमेकांशी चांगली मैत्री झाली आहे.

    दुबई : आयपीएल (IPL 2020)ने क्रिकेटला फक्त जास्त रोमांचकच बनवलं नाही, तर वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेटपटूंना आणखी जवळ आणलं आहे. आयपीएलमुळे जगातल्या क्रिकेटपटूंची एकमेकांशी चांगली मैत्री झाली आहे. आयीएपमुळे सचिन तेंडुलकर, रिकी पॉण्टिंग एका टीमकडून खेळले, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. मागच्या 8 वर्षांपासून विराट कोहली (Virat Kohli)आणि एबी डिव्हिलियर्सही बैंगलोरकडून खेळत आहेत. आयपीएलमुळे या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाल्याचंही दोघं नेहमी आवर्जून सांगतात. अनेक वेळा क्रिकेटपटूंच्या मैत्रीची ही झलक मैदानातही दिसते. असंच काहीस चित्र चेन्नई (Chennai Superkings) आणि पंजाब (Kings XI Punjab)यांच्यातल्या सामन्यात बघायला मिळालं. चेन्नईने या मॅचमध्ये पंजाबचा 10 विकेटने पराभव केला. यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि क्रिस गेल (Chris Gayle) एकमेकांना भेटले. धोनी गेलच्याच अंदाजात चालत त्याला भेटायला गेला. धोनीच्या स्टाईलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिस गेलला या मोसमात अजूनपर्यंत खेळण्याची संधी मिळाली नाही. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्येही तो बेंचवरच होता. या मॅचनंतर धोनीने पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांच्यासोबतही चर्चा केली. धोनी राहुल मागच्यावर्षी झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून एकत्र खेळले होते.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या