मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : चेन्नईचा पराभव, पण धोनीच्या नावावर झाला आणखी एक विश्वविक्रम

IPL 2020 : चेन्नईचा पराभव, पण धोनीच्या नावावर झाला आणखी एक विश्वविक्रम

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नईला (CSK)आणखी एक पराभवाचा धक्का बसला आहे. बॅंगलोर (RCB)ने या मॅचमध्ये चेन्नईचा 37 रननी पराभव केला. यावर्षी धोनी (MS Dhoni) च्या टीमची कामगिरी खराब झाली असली, तरी त्याने बॅंगलोरविरुद्धच्या मॅचमध्ये विश्वविक्रम केला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

दुबई, 11 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नईला (CSK)आणखी एक पराभवाचा धक्का बसला आहे. बॅंगलोर (RCB)ने या मॅचमध्ये चेन्नईचा 37 रननी पराभव केला. यावर्षी धोनी (MS Dhoni) च्या टीमची कामगिरी खराब झाली असली, तरी त्याने बॅंगलोरविरुद्धच्या मॅचमध्ये विश्वविक्रम केला आहे. या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करताना बँगलोरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 169 रन केले. विकेट कीपर असलेल्या धोनीने दोन कॅच पकडत दिनेश कार्तिकला मागे टाकलं आहे.

एमएस धोनीने पहिले शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर एबी डिव्हिलियर्सचा कॅच पकडला, त्यामुळे एबी एकही रन न करता पॅव्हेलियनमध्ये गेला. यानंतर धोनीने सॅम करनच्या बॉलिंगवर वॉशिग्टंन सुंदरचाही कॅच घेतला. सुंदर 10 रन करुन आऊट झाला. याचसोबत आयपीएलमध्ये विकेट कीपर म्हणून धोनीचे 106 कॅच झाले आहेत. एमएस धोनीने कोलकाता नाईट रायडर्स (KKR)चा कर्णधार आणि विकेट कीपर दिनेश कार्तिकला मागे टाकलं आहे. कार्तिकच्या नावावर विकेट कीपर म्हणून 104 कॅच आहेत.

याचसोबत एका टीमसाठी सर्वाधिक कॅच घेण्याचा विश्वविक्रमही धोनीने त्याच्या नावावर केला आहे. एकाच टीमसाठी सर्वाधिक कॅच पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी पहिल्या क्रमांकावर गेला आहे.

एकाच टीमकडून सर्वाधिक कॅच पकडणारे खेळाडू

एमएस धोनी- 106 कॅच- चेन्नई सुपर किंग्ज

स्टीवन क्रॉफ्ट- 105 कॅच- लैंकशायर

सुरेश रैना- 103 कॅच- चेन्नई सुपर किंग्ज

कायरन पोलार्ड- 98 कॅच- मुंबई इंडियन्स

विराट कोहली- 85 कॅच- रॉयल चॅलेंजर्च बँगलोर

आयपीएलच्या यंदाच्या वर्षी चेन्नईची कामगिरी खराब झाली आहे. यावर्षी चेन्नईने 7 पैकी 5 मॅच गमावल्या आहेत, तर फक्त 2 मॅचमध्येच त्यांचा विजय झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. तर विराटच्या टीमने 6 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. बैंगलोरची टीम पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

First published: