दुबई, 30 सप्टेंबर : इयन मॉर्गन (Eoin Morgan)च्या छोटेखानी खेळीमुखे राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता (Kolkata Knight Riders)ला 174 रनपर्यंत मजल मारता आली. मॉर्गनने 23 बॉलमध्ये नाबाद 34 रनची खेळी केली.
राजस्थानने या मॅचमध्ये टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंगला आलेल्या कोलकात्याची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. 5 व्या ओव्हरमध्येच सुनील नारायणच्या रुपात त्यांना पहिला धक्का लागला. यानंतर शुभमगन गिल आणि नितीश राणा यांनी कोलकात्याच्या इनिंगला आकार द्यायला सुरुवात केली. पण मोठी धावसंख्या उभारायच्या आतच नितीश राणा 22 रनवर आणि शुभमगन गिल 47 रनवर माघारी परतले.
चौथ्या क्रमांकावर आलेल्या आंद्रे रसेलने फटकेबाजी करायला सुरुवात केली, पण 14 बॉलमध्ये 24 रन करुन रसेल आऊट झाला. कर्णधार दिनेश कार्तिकलाही मोठी खेळी करता आली नाही. जोफ्रा आर्चरने 1 रनवर त्याची विकेट घेतली. जोफ्रा आर्चरने 4 ओव्हरमध्ये फक्त 18 रन देऊन 2 विकेट घेतल्या. तर अंकित राजपूत, जयदेव उनाडकट, टॉम कुरन आणि राहुल टेवटिया यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानने दोन्ही मॅच जिंकल्या आहेत, त्यामुळे विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी राजस्थानला 175 रनची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे कोलकात्याने आतापर्यंत खेळलेल्या 2 मॅचपैकी एका मॅचमध्ये विजय आणि एका मॅचमध्ये पराभव पत्करला. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम पहिल्या आणि कोलकात्याची टीम सातव्या क्रमांकावर आहे.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.