Home /News /sport /

IPL 2020 जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला मोहम्मद कैफचा कानमंत्र, म्हणाला...

IPL 2020 जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला मोहम्मद कैफचा कानमंत्र, म्हणाला...

आयपीएल 2020 (IPL 2020) चा प्रत्येक सामना फॅन्सची उत्कंठा वाढवणारा ठरत आहे. आयपीएलची ट्रॉफी यावर्षी कुणाकडे जाणार याचा अंदाज लावला जात आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ याने त्यांची उर्वरित सामन्यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
    दुबई, 21 ऑक्टोबर : आयपीएल 2020 (IPL 2020) चा प्रत्येक सामना फॅन्सची उत्कंठा वाढवणारा ठरत आहे. प्रत्येक सामन्यात खेळाडू यशाच्या शिखरावर पोहोचत आहेत. आयपीएलची ट्रॉफी यावर्षी कुणाकडे जाणार याचा अंदाज लावला जात आहे. दरम्यान यावर्षी खूपच चांगला परफॉर्मन्स देणारी दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम पॉइंट टेबलमध्ये नंबर वन आहे. दरम्यान गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर मंगळवारी पंजाबनं अव्वल स्थानी असलेल्या दिल्लीला 5 विकेटनं पराभूत केले. दिल्लीने आतापर्यंत दहापैकी सात सामने जिंकले आहेत. पंजाबबरोबरच्या मॅचआधी दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ म्हणाला होता की, इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2020) दुसर्‍या टप्प्यात त्याच्या संघाचं लक्ष्य रन्सचं टारगेट पूर्ण करण्यावर असेल. कारण आतापर्यंत त्यांनी त्यांच्या स्कोअरचा बचाव चांगला केला आहे.  हरलेल्या सामन्यांपैकी एक सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना गमावला आहे. (हे वाचा-भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मुंबईचा हा फास्ट बॉलर रेसमध्ये) 29 सप्टेंबरला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer)  टीम 163 धवांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाही, परंतु शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात 180 धावांचं लक्ष्य गाठण्यात ते यशस्वी झाले. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या (Kings XI Punjab)सामन्याच्या आदल्या दिवशी मोहम्मद कैफ म्हणाला की, 'आम्ही आता खूपच खूश आहोत कारण पहिल्या सामन्यात आम्ही लक्ष्याचा पाठलाग केला तेव्हा आम्ही सनरायझर्सकडून हरलो. आम्हाला 160 च्या जवळचं लक्ष्य साध्य करता आलं नव्हतं. पण आता आम्ही चेन्नईविरुद्ध खूप चांगलं प्रदर्शन केलं. हे लक्ष्य साध्य करणं कठीण होतं.' तो पुढे म्हणाला, 'आतापर्यंत स्पर्धेत आम्ही योग्य प्रकारे लक्ष्य साध्य करू शकलो नाही आहोत. आमची टीम अशी आहे की आम्हाला स्कोअरचा बचाव चांगल्याप्रकारे करता येत आहे. आमच्या गोलंदाजांनी आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी बजावली आहे.' (हे वाचा-IPL 2020 : लारा म्हणतो, 'हा भारतीय खेळाडू माझ्या टीमच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये') माजी भारतीय क्रिकेटपटू कैफ म्हणाला, ‘IPL सारखी स्पर्धा जिंकण्यासाठी ऑलराउंड कामगिरी करावी लागेल. जर तुम्ही प्रथम फलंदाजी करत आहात तर तुम्हाला समोरच्या संघासमोर धावांचं मोठं लक्ष्य उभं करावं लागेल जे आतापर्यंत आम्ही या स्पर्धेत करत आहोत. परंतु जर कधी आम्ही दुसऱ्यांदा फलंदाजी करत असू तर त्या लक्ष्याला गाठण्यास सुद्धा आम्ही सक्षम असायला हवं असं मला वाटतं". कैफने त्याचा आयपीएल जिंकण्याचा मंत्र सांगितला आहे. दिल्लीचा संघ त्यांच्या प्रशिक्षणाखाली आणखी कोणते विक्रम गाठतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या