Home /News /sport /

IPL 2020 : सूर्यकुमार यादवने पकडला भन्नाट कॅच, बोल्टही बघत बसला, पाहा VIDEO

IPL 2020 : सूर्यकुमार यादवने पकडला भन्नाट कॅच, बोल्टही बघत बसला, पाहा VIDEO

IPL 2020 कोलकाता (KKR) विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने सुरुवातीलाच धक्के दिले. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)ने राहुल त्रिपाठीचा भन्नाट कॅच पकडला

    अबु धाबी, 16 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मुंबईची बॉलिंग आणि सुरुवातीलाच मिळत असलेल्या विकेट हे त्यांच्या विजयाचं महत्त्वाचं कारण आहे. कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्येही मुंबईच्या बॉलरनी शानदार सुरुवात केली. या मॅचमध्ये कोलकाताचा कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर ट्रेन्ट बोल्टने मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. सूर्यकुमार यादवने भन्नाट कॅच पकडून राहुल त्रिपाठीला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये ट्रेन्ट बोल्टच्या बॉलिंगवर राहुल त्रिपाठीने बॉल पॉईंटच्या दिशेने मारला. तिकडे फिल्डिंगला उभ्या असलेल्या सूर्यकुमार यादवने हवेत उडी मारून शानदार कॅच पकडला. ट्रेन्ट बोल्टही सूर्यकुमार यादवचा हा कॅच बघतच राहिला. सोशल मीडियावरही सूर्यकुमार यादवने पकडलेला हा कॅच व्हायरल होत आहे. कोलकात्याचा स्कोअर 18 रन असताना मुंबईला पहिली विकेट मिळाली. राहुल त्रिपाठी 9 बॉलमध्ये 1 फोर मारून 7 रनवर खेळत होता. पण सूर्यकुमार यादवने त्याला फार काळ मैदानात राहू दिलं नाही. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ने या मॅचआधी कोलकाताचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्याऐवजी इयन मॉर्गनकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं. या मॅचसाठी कोलकात्याने त्यांच्या टीममध्ये दोन आणि मुंबईने एक बदल केला. कोलकात्याने क्रिस ग्रीन आणि शिवम मावीला टीममध्ये संधी दिली, तर मुंबईने जेम्स पॅटिनसनच्या जागी नॅथन कुल्टर नाईलला टीममध्ये घेतलं. मुंबईची टीम रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर नाईल, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह कोलकाता नाईट रायडर्स राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नितीश राणा, इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, क्रिस ग्रीन, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या