IPL 2020 : मुंबईच्या बॉलरकडून दिल्लीची दाणादाण, 11 वर्षातला नकोसा रेकॉर्ड

आयपीएल (IPL 2020)च्या पहिल्या प्ले-ऑफमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने दिल्ली (Delhi Capitals)ची दाणादाण उडवून दिली.

आयपीएल (IPL 2020)च्या पहिल्या प्ले-ऑफमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने दिल्ली (Delhi Capitals)ची दाणादाण उडवून दिली.

  • Share this:
    दुबई, 5 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या पहिल्या प्ले-ऑफमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने दिल्ली (Delhi Capitals)ची दाणादाण उडवून दिली. टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीची सुरुवात चांगली झाली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच बॉलला आऊट झाला, यानंतरही क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमार यादवने आक्रमण सुरूच ठेवलं, तर शेवटच्या काही ओव्हरमध्ये इशान किशन आणि हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी केली. इशान किशनने 30 बॉलमध्ये नाबाद 55 रन केले, तर हार्दिकने 14 बॉलमध्येच नाबाद 37 रनची खेळी केली. सूर्यकुमार यादवने 51 आणि डिकॉक 40 रन करून माघारी परतले. यामुळे मुंबईने दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 201 रनचं आव्हान दिलं. मुंबईने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली. शून्य रनवरच दिल्लीचे पहिले तिन्ही बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. ट्रेन्ट बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्लीला 2 धक्के दिले, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये बुमराहने एक विकेट घेतली. मुंबईच्या इनिंगची पहिलीच ओव्हर टाकणाऱ्या बोल्टने दुसऱ्याच बॉलला पृथ्वी शॉला क्विंटन डिकॉककरवी कॅच आऊट केलं. तर अजिंक्य रहाणेला ओव्हरच्या पाचव्या बॉलवर बोल्टने एलबीडब्ल्यू केलं. यानंतर बुमराहने दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर शिखर धवनला बोल्ड केलं. आयपीएल इतिहासात पहिले तिन्ही बॅट्समन शून्यवर आऊट होण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी 2009 साली चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबादच्या टीमने सुरुवातीचे तिन्ही बॅट्समन शून्य रनवर गमावले होते. गिलख्रिस्ट, गिब्स आणि लक्ष्मण यांच्या विकेट चेन्नईच्या बॉलरनी शून्य रनवर घेतल्या होत्या.
    Published by:Shreyas
    First published: