Home /News /sport /

IPL 2020 : पर्पल कॅप बुमराह जिंकणार का रबाडा? सेहवाग म्हणतो...

IPL 2020 : पर्पल कॅप बुमराह जिंकणार का रबाडा? सेहवाग म्हणतो...

आयपीएल (IPL 2020) मध्ये आज मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals)यांच्यात सामना होत आहे.

    दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये आज मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals)यांच्यात सामना होत आहे. या स्पर्धेत मुंबईने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर दिल्लीने सुरुवातीला चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांच्या मार्गात थोडे अडथळे आले, पण अखेर त्यांनी फायनल गाठली. मुंबईने या मोसमात दिल्लीचा तीनवेळा पराभव केला असला, तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही. दिल्लीकडेही असे खेळाडू आहेत, जे एकहाती मॅच पलटवू शकतात. दिल्ली आणि मुंबई यांच्यातल्या खेळाडूंमध्येही या मॅचमध्ये महत्त्वाची लढत होणार आहे. मुंबईचा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि दिल्लीचा कगिसो रबाडा (Kagiso Rabada) यांच्यात पर्पल कॅप जिंकण्यासाठीची स्पर्धा असेल. बुमराह आणि रबाडा यांच्यात विकेटमध्ये फारसं अंतर नसलं, तरी ही स्पर्धा रबाडा जिंकेल, असं भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला (Virender Sehwag) वाटतं. आयपीएलमध्ये रबाडाने 29 विकेट घेतल्या आहेत, तर बुमराहच्या नावावर 27 विकेट आहेत. आयपीएल फायनल दोघांसाठी या मोसमातली शेवटची मॅच असेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये बुमराहने 14 रन देऊन दिल्लीच्या 4 विकेट घेतल्या होत्या. तर 31 ऑक्टोरबरच्या मॅचमध्ये बुमराहने 17 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या. त्याआधी झालेल्या दिल्लीविरुद्धच्याच मॅचमध्ये बुमराहला एकही विकेट मिळाली नव्हती, पण त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 26 रनच दिले होते. या मोसमात बुमराहने दिल्लीविरुद्ध 3 मॅचमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. तर दुसरीकडे रबाडाला फक्त मुंबईच्या 2 विकेटच घेता आल्या आहेत. आता फायनलमध्ये कोण कोणावर भारी पडतं, आणि कोण पर्पल कॅप पटकवतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या