IPL 2020 : मनिष पांडेला शंकरची साथ, हैदराबादचा राजस्थानवर विजय

IPL 2020 : मनिष पांडेला शंकरची साथ, हैदराबादचा राजस्थानवर विजय

IPL 2020 मनिष पांडे आणि विजय शंकर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबाद (SRH)ने राजस्थान (Rajasthan Royals)चा 8 विकेटने पराभव केला आहे.

  • Share this:

दुबई, 22 ऑक्टोबर : मनिष पांडे आणि विजय शंकर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबाद (SRH)ने राजस्थान (Rajasthan Royals)चा 8 विकेटने पराभव केला आहे. मनिष पांडेने 47 बॉलमध्ये नाबाद 83 रन आणि विजय शंकरने 51 बॉलमध्ये नाबाद 52 रन केले. राजस्थानने ठेवलेल्या 155 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. ओपनर डेव्हिड वॉर्नर 4 रनवर आणि जॉनी बेयरस्टो 10 रनवर आऊट झाले. जोफ्रा आर्चरने या दोन्ही विकेट घेतल्या, पण यानंतर मनिष पांडे आणि विजय शंकरने हैदराबादला एकही विकेट न गमावता जिंकवून दिलं.

या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या जेसन होल्डरने राजस्थानला वारंवार धक्के दिले. होल्डरने 4 ओव्हरमध्ये 33 रन देऊन 3 विकेट घेतल्या, सोबतच त्याने एक रन आऊटही केला. याशिवाय विजय शंकर आणि राशिद खानला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 36 रन केले.

हैदराबादचा यंदाच्या मोसमातला हा चौथा विजय आहे. 10 पैकी 6 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची टीम पाचव्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे राजस्थानचं प्ले-ऑफ गाठण्याचं आव्हान आता दुसऱ्या टीमवर अवलंबून असणार आहे. राजस्थानचा 11 पैकी 4 मॅचमध्ये विजय झाला असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम सातव्या क्रमांकावर आहे.

Published by: Shreyas
First published: October 22, 2020, 11:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या