मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : रोहित शर्मामुळेच हा खेळाडू मुंबईच्या टीममध्ये

IPL 2020 : रोहित शर्मामुळेच हा खेळाडू मुंबईच्या टीममध्ये

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians) ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मुंबईच्या टीमने 7 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत, तर फक्त 2 मॅचमध्येच त्यांना पराभव पत्करावा लागला.

  • Published by:  Shreyas
दुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians) ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मुंबईच्या टीमने 7 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत, तर फक्त 2 मॅचमध्येच त्यांना पराभव पत्करावा लागला. मुंबईच्या अर्ध्या मॅच झाल्यानंतर टीमचे प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene)यांनी पुढच्या रणनीतीवर भाष्य केलं आहे. युएईच्या खेळपट्ट्या आता संथ व्हायला लागल्या आहेत, तरीही महेला जयवर्धने यांनी टीममध्ये जास्त फास्ट बॉलर खेळवणार असल्याचं सांगितलं. मुंबईचा पुढचा सामना कोलकाताविरुद्ध शुक्रवारी होणार आहे. या मॅचआधी जयवर्धने यांना मुंबई जास्त स्पिनरना खेळवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर जयवर्धने यांनी उत्तर दिलं. 'स्पर्धेत फास्ट बॉलरना मोठी भूमिका निभावायची आहे. मग त्या पॉवर प्लेच्या ओव्हर असो किंवा शेवटच्या ओव्हर. त्यामुळे जोपर्यंत ते योगदान देत आहेत, तोपर्यंत संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. जर ते समोरच्या टीमची बॅटिंग उद्धवस्त करत आहेत, मग तुम्ही कोणत्या खेळपट्टीवर खेळत आहात, याला जास्त महत्त्व उरत नाही,' असं जयवर्धने म्हणाले. बुमराहच्या नेतृत्वात खेळत असलेले मुंबईचे फास्ट बॉलर विश्वस्तरीय आहेत. आमच्याकडे उत्कृष्ट स्पिनरही आहेत, जे सध्या खेळत आहेत. काही खेळाडूंना संधी मिळालेली नाही, पण आम्ही योग्य वेळी त्यांना टीममध्ये घेऊ. परिस्थिती अनुकूल असेल, तर त्यांना नक्कीच संधी मिळेल, पण सध्या आम्ही आमच्या कामगिरीवर खुश आहोत, अशी प्रतिक्रिया जयवर्धने यांनी दिली. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स पॅटिनसनला रोहित शर्माने सांगितल्यामुळे टीममध्ये घेतल्याची कबुलीही जयवर्धने यांनी दिली. मुंबईने फक्त 2 मॅचच हरल्या असल्या तरी संथ होणं परवडणारं नसल्याचं जयवर्धने यांना वाटत आहे.
First published:

पुढील बातम्या