मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : पॅट कमिन्सपेक्षा 13.9 कोटी रुपयांनी स्वस्त बॉलर, पहिल्याच मॅचमध्ये KKRला जिंकवलं

IPL 2020 : पॅट कमिन्सपेक्षा 13.9 कोटी रुपयांनी स्वस्त बॉलर, पहिल्याच मॅचमध्ये KKRला जिंकवलं

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात पॅट कमिन्स (Pat Cummins)हा सगळ्यात महागडा खेळाडू आहे. कोलकाता (KKR)ने त्याला 15.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं.

  • Published by:  Shreyas
अबु धाबी, 18 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात पॅट कमिन्स (Pat Cummins)हा सगळ्यात महागडा खेळाडू आहे. कोलकाता (KKR)ने त्याला 15.50 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं. पण या रकमेला साजीशी कामगिरी कमिन्सला अजून करता आलेली नाही. 9 मॅचमध्ये त्याला फक्त 3 विकेट घेता आल्या आहेत. दुसरीकडे कोलकात्याकडून खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) ने फक्त एकाच मॅचमध्ये कमिन्सला मागे टाकलं, सोबतच टीमला विजय मिळवून दिला. लॉकी फर्ग्युसनला कोलकाताने 1.6 कोटी रुपयांना विकत घेतलं. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये फर्ग्युसनने 15 रन देऊन 3 विकेट घेतल्या. यानंतर सुपर ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट घेऊन कोलकात्याला जिंकवून दिलं. लॉकी फर्ग्युसन जरी पॅट कमिन्सपेक्षा 13.9 कोटी रुपयांनी स्वस्त असला, तरी त्याने पहिल्याच मॅचमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. फर्ग्युसनने हैदराबादच्या बॅट्समनना 150 किमी प्रती तास या वेगाने बॉलिंग केली. IPL 2020: लोकी फर्गुसन ने तो कमाल कर दिया 164 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची सुरुवात चांगली झाली. केन विलियमसन आणि जॉनी बेयरस्टोने हैदराबादला 6 ओव्हरमध्ये 57 रनपर्यंत पोहोचवलं, पण फर्ग्युसन बॉलिंगला आल्यानंतर मॅचचं चित्रच बदलून गेलं. फर्ग्युसनने त्याच्या पहिल्याच बॉलवर विलियमसनची विकेट घेतली. यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 148 किमी प्रती तासाच्या वेगाने टाकलेल्या यॉर्करमुळे मनिष पांडे बोल्ड झाला. फर्ग्युसनने त्याच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 15 रन देऊन 3 विकेट घेतल्या. पहिल्याच मॅचमध्ये फर्ग्युसनने पॅट कमिन्स एवढ्याच विकेट घेतल्या. कमिन्सने 9 मॅचमध्ये फक्त 3 विकेट घेतल्या आहेत. सुपर ओव्हरमध्येही फर्ग्युसनचा करिश्मा सुपर ओव्हरमध्ये पुन्हा एकदा इयन मॉर्गनने फर्ग्युसनच्या हातात बॉल दिला. यावेळीही त्याने टीमला निराश केलं नाही. पहिल्याच बॉलवर फर्ग्युसनने वॉर्नरला बोल्ड केलं, तर तिसऱ्या बॉलवर समदची विकेट घेतली. सुपर ओव्हरमध्ये हैदराबादच्या टीमला फक्त 2 रनच करता आल्या. शेवटी कोलकात्याने अगदी सहज हे आव्हान पूर्ण केलं. फर्ग्युसननेही त्याला 8 मॅच बाहेर ठेवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं एकाच मॅचमध्ये सिद्ध केलं.
First published:

पुढील बातम्या