Home /News /sport /

IPL 2020 : क्रिकेटमधला प्रत्येक दिवस वेगळा, 5 बॉलमध्ये 20 रन करणारा कृणाल आज...

IPL 2020 : क्रिकेटमधला प्रत्येक दिवस वेगळा, 5 बॉलमध्ये 20 रन करणारा कृणाल आज...

क्रिकेटपटूसाठी मैदानातला प्रत्येक दिवस सारखा नसतो. याच मैदानात खेळाडू कधी वेगवेगळे विक्रम स्वत:च्या नावावर करतो, तर कधी 22 यार्डाच्या याच खेळपट्टीवर नकोसे रेकॉर्डही दुसऱ्याच मॅचला त्याच्या नावावर होतात.

    अबु धाबी, 6 ऑक्टोबर : क्रिकेटपटूसाठी मैदानातला प्रत्येक दिवस सारखा नसतो. याच मैदानात खेळाडू कधी वेगवेगळे विक्रम स्वत:च्या नावावर करतो, तर कधी 22 यार्डाच्या याच खेळपट्टीवर नकोसे रेकॉर्डही दुसऱ्याच मॅचला त्याच्या नावावर होतात. असाच काहीसा योगायोग आयपीएल (IPL 2020)मध्ये कृणाल पांड्याच्या नावावर झाला. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये कृणाल पांड्या (Krunal Pandya)ने 500 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. त्या मॅचमध्ये पांड्याने पहिल्या 4 बॉलमध्ये 20 रन ठोकले. आयपीएलमध्ये 500 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारा तो पहिला खेळाडू ठरला. सिद्धार्थ कौलच्या बॉलिंगवर त्याने सिक्स, फोर, फोर आणि सिक्स अशी आतषबाजी केली. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये ही आतषबाजी केल्यानंतर पुढच्याच मॅचमध्ये राजस्थानविरुद्ध मात्र कृणालला चमक दाखवता आली नाही. हैदराबादविरुद्ध पहिल्या 4 बॉलमध्ये 20 रन करणाऱ्या कृणालला या मॅचमध्ये पहिल्या 4 बॉलवर एकही रन काढता आली नाही. राहुल टेवटियाच्या बॉलिंगवर कृणालने पाचव्या बॉलला पहिली रन केली. 17 बॉलमध्ये 12 रन करून कृणाल पांड्या जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगवर आऊट झाला. या मॅचमध्ये कृणालचा स्ट्राईक रेट 70.59 एवढा होता. तसंच कृणाल पांड्याला त्याच्या या खेळीमध्ये फक्त एक सिक्स मारता आली. कृणाल पांड्याच्या आधी आयपीएलमध्ये ऑलराऊंडर क्रिस मॉरिसने 422.22 च्या स्ट्राईक रेटने 9 बॉलमध्ये 38 रनची खेळी केली होती. दुसरीकडे जागतिक क्रिकेटमध्ये दोनच बॅट्समननी 4 बॉलवर 20 पेक्षा जास्त रन केले आहेत. कृणाल पांड्याच्याआधी डेव्हिड वॉर्नरने 4 बॉलमध्ये 22 रन केले होते.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या