IPL 2020 : कोलकात्याच्या बॅटिंगचा संघर्ष, हैदराबादला विजयासाठी 164 रनची गरज

IPL 2020 : कोलकात्याच्या बॅटिंगचा संघर्ष, हैदराबादला विजयासाठी 164 रनची गरज

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात कोलकाताच्या बॅट्समनचा संघर्ष सुरूच आहे. हैदराबाद (SRH)विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)ला 20 ओव्हरमध्ये 163-5 पर्यंत मजल मारता आली.

  • Share this:

अबु धाबी, 18 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात कोलकाताच्या बॅट्समनचा संघर्ष सुरूच आहे. हैदराबाद (SRH)विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)ला 20 ओव्हरमध्ये 163-5 पर्यंत मजल मारता आली. टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलेल्या हैदराबादने सुरुवातीपासूनच कोलकात्याच्या बॅट्समनना जास्त रन करु दिले नाहीत. शेवटच्या काही ओव्हरमध्ये दिनेश कार्तिक आणि इयन मॉर्गन यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकात्याला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली.

दिनेश कार्तिकने 14 बॉलमध्ये नाबाद 29 रन केले, तर इयन मॉर्गन 23 बॉलमध्ये 34 रन करून शेवटच्या बॉलवर आऊट झाला. आंद्रे रसेल वगळता कोलकात्याच्या सगळ्या बॅट्समनना सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रसेल 11 बॉलमध्ये 9 रन करून माघारी परतला. ओपनर शुभमन गिलने 36 आणि राहुल त्रिपाठीने 23 रन केले, तर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या नितीश राणाने 20 बॉलमध्ये 29 रन केले. हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर बसील थंपी, विजय शंकर आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

हैदराबादने या मॅचसाठी टीममध्ये दोन बदल केले आहेत. खलील अहमद आणि शाहबाज नदीम यांच्याऐवजी बसील थंपी आणि अब्दुल समदला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे कोलकात्यानेही त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले आहेत. कुलदीप यादव आणि लॉकी फरग्युसन यांची टीममध्ये निवड झाली आहे. तर प्रसिद्ध कृष्णा आणि क्रिस ग्रीन यांना बाहेर बसावं लागलं आहे.

प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी या दोन्ही टीमना आज विजय मिळवणं गरजेचं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता (KKR)चौथ्या क्रमांकावर आणि हैदराबाद पाचव्या क्रमांकावर आहे. कोलकात्याने या मोसमात 8 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर हैदराबादने यंदा 8 पैकी 3 मॅच जिंकल्या, तर 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.

हैदराबादची टीम

डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, केन विलियमसन, प्रियम गर्ग, विजय शंकर, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, टी नटराजन, बसील थंपी

कोलकाताची टीम

राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, शिवम मावी, कुलदीप यादव, लॉकी फरग्युसन, वरुण चक्रवर्ती

Published by: Shreyas
First published: October 18, 2020, 3:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading