Home /News /sport /

IPL 2020 : दिल्लीचा सामना कोलकात्याशी, कार्तिकचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय

IPL 2020 : दिल्लीचा सामना कोलकात्याशी, कार्तिकचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय

आयपीएल (IPL 2020) च्या आजच्या मॅचमध्ये कोलकाता (Kolkata Knight Riders)चा कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ने टॉस जिंकून दिल्ली (Delhi Capitals)ला पहिले बॅटिंग दिली आहे.

    शारजाह : आयपीएल (IPL 2020) च्या आजच्या मॅचमध्ये कोलकाता (Kolkata Knight Riders)चा कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ने टॉस जिंकून दिल्ली (Delhi Capitals)ला पहिले बॅटिंग दिली आहे. आजच्या मॅचसाठी या दोन्ही टीमनी बदल केले आहेत. कोलकात्याने कुलदीप यादवऐवजी राहुल त्रिपाठीला टीममध्ये घेतलं आहे, तर दिल्लीने अक्सर पटेलऐवजी आर.अश्विन आणि इशांत शर्माऐवजी हर्षल पटेलला संधी दिली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम तिसऱ्या आणि कोलकाता चौथ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही टीमनी त्यांच्या 3 पैकी 2 मॅच जिंकल्या आणि एका मॅचमध्ये दोघांना पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीची टीम पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिमरन हेटमायर, मार्कस स्टॉयनीस, आर अश्विन, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, एनरिच नोर्टजे, अमित मिश्रा कोलकात्याची टीम शुभमन गिल, सुनील नारायण, नितीश राणा, दिनेश कार्तिक, इओन मॉर्गन, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या