मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : चांगल्या सुरुवातीनंतरही चेन्नईची पुन्हा पडझड, कोलकात्याचा विजय

IPL 2020 : चांगल्या सुरुवातीनंतरही चेन्नईची पुन्हा पडझड, कोलकात्याचा विजय

यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मध्ये चेन्नईची पराभवाची मालिका सुरूच आहे. पंजाबविरुद्ध 10 विकेटने विजय मिळवल्यानंतर आता कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा 10 रनने पराभव झाला आहे.

  • Published by:  Shreyas

अबु धाबी, 7 ऑक्टोबर : यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मध्ये चेन्नईची पराभवाची मालिका सुरूच आहे. पंजाबविरुद्ध 10 विकेटने विजय मिळवल्यानंतर आता कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा 10 रनने पराभव झाला आहे. कोलकात्याने ठेवलेल्या 168 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना फाफ डुप्लेसिस आणि शेन वॉटसनने चेन्नईला 3.4 ओव्हरमध्येच 30 रनची पार्टनरशीप करून दिली. डुप्लेसिस आऊट झाल्यानंतरही वॉटसनने रायुडूच्या मदतीने कोलकात्याच्या बॉलरवर आक्रमण सुरूच ठेवलं.

12.1 ओव्हरमध्ये स्कोअर 99 रन असताना रायुडू 30 रन करून आऊट झाला, यानंतर चेन्नईच्या पडझडीला सुरुवात झाली. शेन वॉटसन 40 बॉलमध्ये 50 रन करुन आऊट झाला. रवींद्र जडेजा 8 बॉलमध्ये 21 रनवर नाबाद राहिला. कोलकात्याकडून शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, कमलेश नागरकोटी, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

त्याआधी कोलकात्याने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. 20 ओव्हरमध्ये 167 रनवर कोलकात्याचा ऑल आऊट झाला. राहुल त्रिपाठीने 51 बॉलमध्ये 81 रनची खेळी केली. केकेआरच्या इतर कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेन्नईकडून ब्राव्होने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सॅम करन, शार्दुल ठाकूर आणि कर्ण शर्माला प्रत्येकी 2-2 विकेट घेता आल्या.

चेन्नईविरुद्धच्या या विजयासोबतच कोलकात्याची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. कोलकात्याने 5 पैकी 3 मॅचमध्ये विजय मिळवला आहे, तर 2 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे चेन्नईने खेळलेल्या 6 मॅचपैकी फक्त 2 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.

First published: