Home /News /sport /

IPL 2020 : 'थाला' म्हणणाऱ्या चाहतीला केएल राहुल म्हणाला...

IPL 2020 : 'थाला' म्हणणाऱ्या चाहतीला केएल राहुल म्हणाला...

यंदाची आयपीएल (IPL 2020) केएल राहुल (KL Rahul)साठी स्वप्नसारखीच ठरत आहे. स्पर्धेत 6 पराभव पत्करावे लागले असले तरीही आपल्या बॅटिंगमुळे राहुल चमकतोय. सुरुवातीपासून आयपीएलमधली सर्वाधिक रनची ऑरेंज कॅप अजूनही केएल राहुलकडेच आहे.

    दुबई, 21 ऑक्टोबर : यंदाची आयपीएल (IPL 2020) केएल राहुल (KL Rahul)साठी स्वप्नसारखीच ठरत आहे. स्पर्धेत 6 पराभव पत्करावे लागले असले तरीही आपल्या बॅटिंगमुळे राहुल चमकतोय. सुरुवातीपासून आयपीएलमधली सर्वाधिक रनची ऑरेंज कॅप अजूनही केएल राहुलकडेच आहे. सुरुवातीला पराभवांची मालिका पाहिलेल्या पंजाबने आता लागोपाठ तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. पंजाबने मंगळवारी दिल्लीच्या टीमचा पराभव केला, त्याआधी रविवारी अत्यंत रोमांचक अशा दोन सुपर ओव्हरच्या सामन्यातही पंजाबचा विजय झाला. या मॅचमध्ये राहुलने 77 रनची दणदणीत खेळी केली. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मॅचमध्ये दोनदा सुपर ओव्हर झाली.ट्रेंट बोल्टच्या दुसर्‍या सुपर ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर ख्रिस गेलने मारलेल्या सिक्समुळे पंजाबसमोरचं लक्ष्य निम्यावर आलं. त्याआधी मयांक अगरवालने अप्रतिम फिल्डिंग करत पोलार्डचा सिक्स रोखला, ज्यामुळे पंजाबचं आव्हान मर्यादित राहिलं. ह्या विजयामध्ये पंजाबचा कर्णधार राहुलचा सुद्धा मोलाचा वाटा होता. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये केएल राहुलने डी कॉकला रनआउट करताना झेप घेत बॉल स्टम्पवर मारला. यानंतर अनेक चाहत्यांनी राहुलच्या कौतुकासाठी ट्विट केलं. त्यातलं एक ट्विट विशेष गाजलं, त्याचं कारणही तसंच होतं. राहुलच्या त्या रनआउटचा फोटो शेअर करताना एकाने 'माय थला' असं लिहिलं. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या कर्तृत्वाने थला म्हणजे नेता ही पदवी कमावली आहे. पण केएल राहुलने लगेचच त्याच्या फॅनच्या ट्विटला उत्तर दिलं, आणि ट्विट केलं, "थला फक्त एकच आहे गजल, आणि तो कोण आहे हे सर्वांनाच माहिती आहे." चाहत्याकडून मिळालेली पदवी राहुलनी नम्रपणे नाकारली आणि एक चांगलं उदाहरण घालून दिलं. गेल्या कित्येक वर्षांमध्ये, महेंद्रसिंग धोनीने यलो आर्मीला मोठे विजय मिळवून दिल्याबद्दल चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांनी 'थला' (नेता) ही पदवी दिली आहे आणि केएल राहुलने त्याचा आदर राखला. त्यानंतर अनेकांनी राहुलच्या ट्विटचं कौतुक केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या