Home /News /sport /

IPL 2020 : पडझडीनंतर मॉर्गन-कमिन्सने KKRला सावरलं, मुंबईला 149 रनचं आव्हान

IPL 2020 : पडझडीनंतर मॉर्गन-कमिन्सने KKRला सावरलं, मुंबईला 149 रनचं आव्हान

IPL 2020 सुरुवातीच्या पडझडीनंतर इओन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांच्या नाबाद खेळीने मुंबई (Mumbai Indians) विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता (KKR) ला सावरलं आहे. 20 ओव्हरमध्ये कोलकात्याने 5 विकेट गमावून 148 रन केले आहेत.

    अबु धाबी, 16 ऑक्टोबर : सुरुवातीच्या पडझडीनंतर इओन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांच्या नाबाद खेळीने मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याला सावरलं आहे. 20 ओव्हरमध्ये कोलकात्याने 5 विकेट गमावून 148 रन केले आहेत. पॅट कमिन्सने 36 बॉलमध्ये 53 तर कर्णधार इयन मॉर्गनने 29 बॉलमध्ये 39 रन केले. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या कोलकात्याची सुरुवात खराब झाली. मुंबईच्या बॉलरनी पहिल्यापासूनच कोलकात्याला वारंवार धक्के दिले. 61 रनवरच कोलकात्याची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये परतली होती. पण यानंतर मॉर्गन आणि कमिन्स यांनी त्यांची एकही विकेट पडू दिली नाही. मुंबईकडून राहुल चहरने 4 ओव्हरमध्ये फक्त 18 रन देऊन 2 विकेट घेतल्या. या दोन्ही विकेट लागोपाट 2 बॉलला आल्या. तर बोल्ट, कुल्टर-नाईल आणि बुमराहला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या सामन्यात कोलकाता (KKR)  नवीन कर्णधारासह मैदानात उतरली आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्याच्याऐवजी इयन मॉर्गन (Eoin Morgan) ला कोलकात्याच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये इयन मॉर्गनने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians) ने एक आणि कोलकात्याने दोन बदल केले आहेत. जेम्स पॅटिनसनच्याऐवजी मुंबईने नॅथन कुल्टर नाईलला संधी दिली आहे. तर तर कोलकात्याने बॅन्टन आणि नागरकोटीच्या ऐवजी मावी आणि ग्रीन यांना टीममध्ये घेतलं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईने खेळलेल्या 7 पैकी 5 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे, तर 2 मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे कोलकात्याने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या, तर 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकात्याची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबईचा कोलकात्यावर कायमच पगडा राहिला आहे. आयपीएल इतिहासात या दोन टीममध्ये झालेल्या सामन्यांपैकी 20 मुंबईने तर फक्त 6 कोलकात्याने जिंकले आहेत. यावर्षीही झालेल्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईने कोलकात्याला धूळ चारली आहे. मुंबईची टीम रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर नाईल, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह कोलकाता नाईट रायडर्स राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नितीश राणा, इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, क्रिस ग्रीन, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या