Home /News /sport /

IPL 2020 : राहुल त्रिपाठीने संधीचं सोनं केलं, पण CSKच्या बॉलिंगपुढे KKRचा संघर्ष

IPL 2020 : राहुल त्रिपाठीने संधीचं सोनं केलं, पण CSKच्या बॉलिंगपुढे KKRचा संघर्ष

आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या मॅचमध्ये कोलकाता (Kolkata Knight Riders)चा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

    अबु धाबी, 7 ऑक्टोबर : कोलकात्याने ओपनिंगला खेळायला दिलेल्या संधीचं राहुल त्रिपाठीने सोनं केलं. पण टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या कोलकात्याच्या दुसऱ्या बॅट्समनना मात्र संघर्ष करावा लागला. 20 ओव्हरमध्ये कोलकात्याचा 167 रनवर ऑलआऊट झाला. राहुल त्रिपाठीने 51 बॉलमध्ये 82 रनची खेळी केली. कोलकात्याच्या इतर कोणत्याही बॅट्समनना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेन्नईकडून ब्राव्होने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सॅम करन, शार्दुल ठाकूर आणि यंदाच्या मोसमातली पहिलीच मॅच खेळणाऱ्या कर्ण शर्मा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. कोलकात्याच्या टीमने या मॅचमध्ये सुनील नारायणच्या ऐवजी राहुल त्रिपाठीला शुभमन गिलसोबत ओपनिंगला खेळवण्याचा निर्णय घेतला होता. या मॅचमध्ये कोलकात्याने त्यांच्या टीममध्ये एकही बदल केलेला नाही, तर चेन्नईने मात्र पियुष चावलाच्या ऐवजी कर्ण शर्माला संधी दिली आहे. या संपूर्ण मोसमात बॅटिंग साठी संघर्ष करणाऱ्या चेन्नईला बॅटिंगमध्ये सूर गवसला. पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा एकही विकेट न गमावता विजय झाला. फाफ डुप्लेसिस आणि शेन वॉटसन यांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत चेन्नईला जिंकवून दिलं. लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा कोलकात्याची टीम शुभमन गिल, सुनील नारायण, नितीश राणा, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, इओन मॉर्गन, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती चेन्नईची टीम शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वॅन ब्राव्हो, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कर्ण शर्मा
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या