Home /News /sport /

IPL 2020 : RCB च्या बॉलिंगसमोर KKRने गुडघे टेकले, 20 ओव्हरमध्ये फक्त 84 रन

IPL 2020 : RCB च्या बॉलिंगसमोर KKRने गुडघे टेकले, 20 ओव्हरमध्ये फक्त 84 रन

आयपीएल (IPL 2020) मध्ये बँगलोर (RCB)च्या बॉलिंगसमोर कोलकाता (KKR) च्या बॅट्समननी गुडघे टेकले. 20 ओव्हरमध्ये कोलकात्याला फक्त 84 रनच करता आल्या.

    अबु धाबी, 21 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये बँगलोर (RCB)च्या बॉलिंगसमोर कोलकाता (KKR) च्या बॅट्समननी गुडघे टेकले. 20 ओव्हरमध्ये कोलकात्याला फक्त 84 रनच करता आल्या. या मॅचमध्ये कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण बँगलोरच्या बॉलरनी मॉर्गनचा हा निर्णय चुकीचा ठरवला. मोहम्मद सिराजने सुरुवातीलाच 2 ओव्हर मेडन टाकून कोलकात्याच्या 3 विकेट घेतल्या. सिराजशिवाय चहलला 2 आणि नवदीप सैनी-वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. कोलकात्याकडून मॉर्गनने सर्वाधिक 30 रन केले. 20 ओव्हर बॅटिंग केल्यानंतरचा आयपीएल इतिहासातला हा सगळ्यात कमी स्कोअर आहे. या मॅचआधी कोलकात्याला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा दिग्गज खेळाडू ऑलराऊंडर आंद्रे रसेल या मॅचमध्ये खेळणार नाही. त्याच्याऐवजी टॉम बॅन्टनला संधी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे शिवम मावीच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची टीममध्ये वर्णी लागली आहे. बँगलोरनेही त्यांच्या टीममध्ये एक बदल केला आहे. शाहबाज नदीमच्या ऐवजी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये बँगलोरची टीम तिसऱ्या आणि कोलकात्याची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. बँगलोरने यंदा 9 पैकी 6 मॅच जिंकल्या आहेत, तर 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे कोलकात्याने 9 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांच्या पदरी निराशा पडली. आजच्या मॅचमध्ये बँगलोरचा विजय झाला, तर मुंबईला मागे टाकत ते पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जातील. कोलकात्याची टीम टॉम बॅन्टन, शुभमन गिल, नितीश राणा, इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक, राहुल त्रिपाठी, पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती बँगलोरची टीम देवदत्त पडीकल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरुकीरत मान, वॉशिंग्टन सुंदर, क्रिस मॉरिस, मोहम्मद सिराज, इसरू उडाना, नवदीप सौनी, युझवेंद्र चहल
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या