Home /News /sport /

IPL 2020 : KKR च्या खेळाडूच्या चौकारांमागचा खरा VIDEO; Lockdown मध्ये घराच्या गच्चीवर पत्नीने करून घेतला होता असा सराव

IPL 2020 : KKR च्या खेळाडूच्या चौकारांमागचा खरा VIDEO; Lockdown मध्ये घराच्या गच्चीवर पत्नीने करून घेतला होता असा सराव

घराच्या गच्चीवर बायकोसह क्रिकेट खेळणारा विराट कोहली काही एकटाच नव्हता. Coronavirus lockdown च्या काळात KKR च्या या खेळाडूचा बायकोमुळेच चांगला सराव झाला.

  दुबई, 30 ऑक्टोबर : IPL च्या ताज्या हंगामात कोलकत्ता नाइट रायडर्सचा (KKR) फलंदाज नितीश राणाने गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (CSK) जोरदार फलंदाजी केली. नितीशने 61 चेंडूत 87 धावा केल्या. यात त्याने 4 षटकार आणि 10 चौकार मारले. यावेळी नितीश राणाने सूर्यकुमार यादवला मागे टाकत एक मोठा विक्रमही केला. पण या तुफान आतषबाजीमागे होता गच्चीवरचा सराव. नितीशनेच एक VIDEO शेअर करत coronavirus lockdown दरम्यान क्रिकेटचा कसा सराव केला हे सांगितलं आहे. नितीशने तोडला सूर्यकुमारचा विक्रम नितीश राणाने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 50 धावा पूर्ण करत आयपीएलमधील सर्वाधिक अर्धशतकं पूर्ण करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला. अनकॅप्ड म्हणजे ज्या खेळाडूनी भारतीय संघात पदार्पण केलेलं नाही. नितीश राणा याने सर्वाधिक 11 अर्धशतकं केली आहेत. आतापर्यंत सूर्यकुमार यादवच्या नावावर 10 अर्धशतकं होती. त्यानंतर ईशान किशन आणि राहुल त्रिपाठीने आतापर्यंत प्रत्येकी 5 अर्धशतकं केली आहेत. केकेआरसाठी सर्वात मोठा डाव खेळण्याचे काम यावेळी नितीश राणाने केले आहे. केकेआर साठी 87 रन बनवून त्याने राहुल त्रिपाठीला (81 धावा) मागे टाकलं आहे. नितीश राणा साकारत आहे एक नवी भूमिका या सिझनमध्ये डाव्याखुरा फलंदाज नवीन भूमिकेत फलंदाजी करत आहे. नितीश राणा हा मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे पण गेल्या तीन सामन्यांत कोलकत्ता त्याला ओपनर म्हणून मैदानात उतरवत आहे. यावेळी नितीश राणाने 3 पैकी 2 सामन्यांत अर्धशतकं केली आहेत.
  View this post on Instagram

  No ground No problem 🏏

  A post shared by Nitish Rana (@nitishrana_official) on

  लॉकडॉउनमध्ये बायको सोबत केला सराव लॉकडाउनदरम्यान नितीश राणा आपल्या पत्नीसह फलंदाजीचा सराव करताना दिसला. राणाने आपली पत्नी साची मारवाह फलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो टेरेसवर फलंदाजीचा सराव करताना दिसत होता. यावेळी साचीने त्याच्याकडून फलंदाजीचा खूपच सराव करून घेतला आहे असे दिसून येते. या सरावामुळे नितीश राणा इतका उत्कृष्ट खेळू शकला असे म्हणायला काहीच हरकत नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. या आयपीएलदरम्यान साचीच्या वडिलांचं निधन झालं. अर्धशतकानंतर आपल्या सासर्‍यांच्या नावाची जर्सी झळकवून नितीश राणाने त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: IPL 2020, Kolkata

  पुढील बातम्या