IPL 2020 : 'करो या मरो'ची लढाई, कोलकात्याचं राजस्थानला मोठं आव्हान

IPL 2020 : 'करो या मरो'ची लढाई, कोलकात्याचं राजस्थानला मोठं आव्हान

आयपीएल (IPL 2020)च्या करो या मरोच्या लढाईत कोलकाता (KKR)ने राजस्थान (Rajasthan Royals)ला 192 रनचं मोठं आव्हान दिलं आहे.

  • Share this:

दुबई, 1 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या करो या मरोच्या लढाईत कोलकाता (KKR)ने राजस्थान (Rajasthan Royals)ला 192 रनचं मोठं आव्हान दिलं आहे. या मॅचमध्ये राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकल्यानंतर जोफ्रा आर्चरने कोलकात्याला पहिलाच धक्का दिला, नितीश राणाला त्याने पहिल्याच बॉलला माघारी पाठवलं. यानंतर शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठीने कोलकात्याचा डाव सावरला. त्रिपाठीने 39 रन आणि गिलने 36 रन केले. तर मॉर्गनने 35 बॉलमध्ये नाबाद 68 रनची खेळी केली. राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर कार्तिक त्यागीला 2 आणि जोफ्रा आर्चर श्रेयस गोपाळला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

आजच्या मॅचमध्ये पराभव होणाऱ्या टीमचं यंदाच्या आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येणार आहे. या मॅचमध्ये राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर कोलकात्याच्या टीममध्ये आंद्रे रसेलचं पुनरागमन झालं आहे, तर रिंकू सिंगच्याऐवजी शिवम मावीही टीममध्ये परतला आहे.

पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम सहाव्या आणि कोलकाताची टीम सातव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही टीमनी त्यांच्या 13 मॅचपैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पण चांगल्या नेट रनरेटमुळे राजस्थानची टीम कोलकात्याच्या पुढे आहे. आजच्या मॅचमध्ये या दोन्हीपैकी एका टीमने जरी विजय मिळवला तरी प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही टीमना दुसऱ्या टीमच्या निकालांवर अवलंबून राहावं लागणार आहे.

राजस्थानची टीम

रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ, जॉस बटलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, वरुण एरॉन, कार्तिक त्यागी

कोलकाताची टीम

शुभमन गिल, नितीश राणा, सुनिल नारायण, इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी, पॅट कमिन्स, कलमेश नागरकोटी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती

Published by: Shreyas
First published: November 1, 2020, 7:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या