IPL 2020 : राहुल-मयंकची शतकी पार्टनरशीपही व्यर्थ, पंजाबचा पराभवांचा 'सिक्सर'

IPL 2020 : राहुल-मयंकची शतकी पार्टनरशीपही व्यर्थ, पंजाबचा पराभवांचा 'सिक्सर'

यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मोसमात पंजाब (KXIP)च्या पराभवांची मालिका सुरूच आहे. कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा 2 रननी पराभव झाला आहे.

  • Share this:

अबु धाबी, 10 ऑक्टोबर : यंदाच्या आयपीएल (IPL 2020)मोसमात पंजाब (KXIP)च्या पराभवांची मालिका सुरूच आहे. कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा 2 रननी पराभव झाला आहे. कोलकात्याने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे ओपनर केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांनी शतकी पार्टनरशीप केली. या दोघांनी 14.2 ओव्हरमध्ये 115 रन केले, पण तरीही पंजाबला हे आव्हान पार करता आलं नाही.

केएल राहुलने 58 बॉलमध्ये 74 तर मयंग अग्रवालने 39 बॉलमध्ये 56 रन केले. कोलकात्याकडून यंदाच्या मोसमात पहिलीच मॅच खेळणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर सुनील नारायणला 2 विकेट घेण्यात यश आलं.

या मॅचमध्ये कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण कोलकात्याची सुरुवात अत्यंत खराब झाली. 14 रनमध्येच त्यांचे दोन बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण पहिले शुभमन गिल (Shubhaman Gill) ने 47 बॉलमध्ये 57 रन करुन कोलकात्याचा डाव सावरला, तर नंतर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ने आक्रमक खेळी केली. कार्तिकच्या 29 बॉलमध्ये केलेल्या 58 रनमुळे कोलकात्याला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

कोलकात्याविरुद्धच्या या पराभवासोबतच पंजाबचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न आणखी कठीण झालं आहे. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या 7 मॅचपैकी फक्त एकच मॅच जिंकली आहे, तर उरलेल्या 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्येही पंजाबची टीम शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे कोलकात्याचा यंदाच्या मोसमातला हा चौथा विजय आहे. आतापर्यंत खेळलेल्या 6 मॅचपैकी 2 मॅचमध्ये कोलकात्याच्या पराभव स्वीकारावा लागला आहे.

Published by: Shreyas
First published: October 10, 2020, 8:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या