IPL 2020 : कोलकात्याचा दिल्लीवर दणदणीत विजय, वरुण चक्रवर्ती चमकला

IPL 2020 : कोलकात्याचा दिल्लीवर दणदणीत विजय, वरुण चक्रवर्ती चमकला

आयपीएल (IPL 2020) च्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)ने दिल्ली (Delhi Capitals)चा पराभव केला आहे.

  • Share this:

अबु धाबी, 24 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)ने दिल्ली (Delhi Capitals)चा पराभव केला आहे. कोलकात्याने ठेवलेल्या 195 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 135 रनच करता आल्या, त्यामुळे कोलकात्याचा 59 रननी पराभव झाला.

कोलकात्याने ठेवलेलं आव्हान गाठण्यासाठी आलेल्या दिल्लीची सुरुवात खराब झाली. अजिंक्य रहाणे पहिल्याच बॉलला आऊट झाला, तर मागच्या दोन्ही मॅचना शतक झळकावलेला शिखर धवन 6 रन करुन माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरायला सुरुवात केली, पण त्यांना फार मोठी मजल मारता आली नाही. दिल्लीकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 47 रन केले. कोलकात्याच्या वरुण चक्रवर्तीने या मॅचमध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 5 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्सला 3 आणि लॉकी फर्ग्युसनला 1 विकेट मिळाली.

या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर कोलकात्याला सुरुवातीला धक्के बसले, पण नितीश राणा आणि सुनिल नारायण यांनी आक्रमक बॅटिंग करत कोलकात्याला 194 रनपर्यंत पोहोचवलं. नारायणने 32 बॉलमध्ये 64 रन आणि नितीश राणाने 53 बॉलमध्ये 81 रनची खेळी केली. दिल्लीकडून रबाडा, नॉर्किया आणि स्टॉयनिसने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

कोलकात्याने दिल्लीवर मिळवलेल्या या विजयामुळे त्यांनी प्ले-ऑफला पोहचण्याचा मार्ग थोडा सोपा केला आहे. दिल्लीवर मोठा विजय मिळवल्यामुळे त्यांचा नेट रनरेटही सुधारला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकात्याची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकात्याने 11 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीने 11 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.

कोलकात्याच्या या विजयामुळे पंजाब, हैदराबाद आणि राजस्थान यांचा प्ले-ऑफला पोहोचण्याचा मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. हैदराबाद आणि पंजाबने 10 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. नेटरनरेट चांगला असल्यामुळे हैदराबाद पाचव्या आणि पंजाब सहाव्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 11 पैकी 4 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये 7व्या क्रमांकावर आहे.

Published by: Shreyas
First published: October 24, 2020, 7:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या